दुधोंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर, निधी प्राप्त करून देऊ : आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

पलूस : दुधोंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दुधोंडी ग्रामपंचायतीने जागेची उपलब्धता करून दिली आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर याना भेटून यासाठी लागणार निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव यांनी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी आज जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी सर्वसामान्य समाजासाठी तसेच आजच्या या वेळेस आरोग्य केंद्र प्रत्येक ठिकाणी गरजेची असल्याने आपण ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र नवीन मंजूर असतील त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देऊ व लागेल तो निधी उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी दुधोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जरूर तो निधी आपण आरोग्य विभागातून मंजूर करून देऊ असे मत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी व्यक्त केले .यावेळी वसगडेचे नरसु पाटील, जयपाल पाटील, शरद जनकोन पाटील, व इतर मान्यवर होते.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना दुधोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी प्राप्त करून द्यावा म्हणून निवेदन कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव, नरसु पाटील, जयपाल पाटील व इतर मान्यवर दिले.