गोवासिनेमा

51व्या इफ्फी चा पडदा अनादर राउंड’ ने उघडणार

गोवा, पणजी : गोव्यात 16 ते 24 जानेवारीत होणार्‍या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा़चा पडदा (इफ्फी) थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनादर राउंड’ या चित्रपटाने उघडणार आहे. कियोशी कुरोसावा यांचा ‘वाइफ ऑफ ए स्पाय’ या जपानी चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती महोत्सवाच्या अधिकृत ट्विट संदेशावरून मिळाली आहे.

‘अनादर राउंड’ हा डॅनिश व स्वीडिश भाषेतील चित्रपट असून तो 1 तास 57 मिनिटांचा आहे. हा चित्रपट डेन्मार्क ची ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री होती. 16 जानेवारी रोजी इफ्फी मध्ये ‘अनादर राउंड’ चा इंडियन प्रिमियर होईल. तर ‘वाइफ ऑफ ए स्पाय’ या चित्रपटाचा इंडियन प्रिमियर 24 जानेवारी रोजी इफ्फी त होईल.

इफ्फी मध्ये ऑस्ट्रीया येथील संदिप कुमार यांचा ‘मेहरूनिसा’ या चित्रपटाचे देखील वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. फारूख जाफर या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. महिलेच्या आयुष्यभराच्या स्वप्नांना पंख देणारा हा चित्रपट आहे. 51व्या इफ्फी मध्ये विविध विभागातून एकूण 224 चित्रपट पहायला मिळतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close