सांगली
भिलवडी पंचशीलनगर येथील पाण्याची बोअरवेल नादुरूस्त
नागरिकांची गैरसोय: त्वरित दुरुस्त करण्याची मागणी

भिलवडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी पंचशिलनगर परिसरातील बोअरवेल नादुरूस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भिलवडी ग्रामपंचायतीने त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.
भिलवडी पंचशीलनगर येथील बोअरवेल गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या बोअरवेलचे पाणी स्थानिक लोक आपल्या घरगुती कामासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. माञ, बोअरवेल नादुरुस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांना याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन बोअरवेलची दुरूस्ती करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.
Share