ताज्या घडामोडी

उमेदवारांना निवडणूक विषयक खर्चाच्या व्यवहारासाठी सहकारी, अनुसूचीत बँकामध्ये स्वतंत्र खाते काढण्याची मुभा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक

 

सांगली, दि. 25  : राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 11 डिसेंबर रोजीच्या पत्रान्वये सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 23 ते 30 डिसेंबर 2020 (दि. 25, 26 व 27 डिसेंबर 2020 सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 16 सप्टेंबर 2017 पत्रान्वये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यातील सहकारी तसेच अनुसूचित बँका (co-operative & Scheduled Banks) मध्ये निवडणुकीकरिता स्वतंत्र खाते उघडण्याची मुभा देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल करू इच्छित असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेसह, अनुसूचीत बँका व जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या शाखेतही बचत खाते निवडणूक विषयक खर्चाच्या व्यवहारासाठी काढता येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close