ताज्या घडामोडीसांगली

ढुंगणावर लाथ मारा, पण आम्ही तुमच्याचसोबत असणार ?

भिलवडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चंपूगिरींची मिजास वाढल्याने धोके उधभवणार

भिलवडी : राज्यात नव्याने होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु झाली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी आणि आसपासच्या काही ग्रामपंचायत क्षेत्रात काहींना ना लोकसहभागाची आवड, ना सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्यास सवड, अशा बहाद्दरांची ढुंगणावर लाथ मारा, पण आम्ही निवडणुकीत तुमच्यासोबत हे चित्र निर्माण झाले आहे. नक्कीच या चंपूगिरींचा मिजास वाढल्याने भाजप आणि काँग्रेस पक्षाला मोठा धोका आहे.

गावपातळीवर काम करीत असताना ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांचा आदर करूनच आणि त्यांच्या आदेशाने, सहकार्याने वागावे लागत असते.  परंतु पक्षाने घेतलेला निर्णय आणि दाखवलेली दिशा याला बगल देत काही चंपूगिरी बहाद्दर मी माझ्या प्रभावाचा नेता समजू पाहत आहे. या प्रत्येक प्रभागातील चंपूगिरींची लोकांतील प्रतिक्रिया पाहुणचं नेत्यांनी जवळ केले पाहिजे. या चंपूगिरींना घरात कोण विचारणार नाही,  माञ,  नेत्यांन समोर उदोउदो करून पोळी भाजून घेण्याचा त्यांचा  प्रयत्न ज्येष्ठांनी वेळीच हाणून पाडला पाहिजे.

भिलवडी आणि आसपासच्या परिसरात होणारी निवडणूक तशी सोपी नाही. उगीचच कोण्या एका चंपूगिरीवर विश्वास ठेवून प्रभावाची वाट लावू नये,  अशी मागणी लोकांतून होत आहे.

नाही तर या चंपूगिरींची भूमिका ढुंगनावर लाथ मारा, पण आम्ही निवडणुकीत तुमच्यासोबत आहोत, अशीच राहणार आहे.

निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन प्रभागातील जबाबदारी ज्येष्ठांनी देण्याची गरज आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close