जिल्हा युवा महोत्सव 26 डिसेंबरला : जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे
प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत 24 डिसेंबर दुपारी 4 पर्यंत मुदत

सांगली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने सन 2020-21 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने दि. 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. Google Meet या ॲपवर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली.
जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या बाबी व कंसात वेळ पुढीलप्रमाणे आहे. लोकनृत्य (15 मिनीटे), लोकगीत (7 मिनीटे), एकांकिका (इंग्रजी/हिंदी)(एकपात्री प्रयोग) (45 मिनीटे), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी/कर्नाटकी) (15 मिनीटे), सितार वादन (15 मिनीटे), बासरी वादन (15 मिनीटे), तबला वादन (10 मिनीटे), विणा वादन (15 मिनीटे), मृदूंग (10 मिनीटे), हामोनियम (लाईट) (10 मिनीटे), गिटार (10 मिनीटे), मनिपुरी नृत्य (15 मिनीटे), ओडिसी नृत्य (15 मिनीटे), भरतनाट्यम (15 मिनीटे), कथ्थक (15 मिनीटे), कुचिपुडी नुत्य (15 मिनीटे), वक्तृत्व (ऐनवेळी देण्यात येणारा विषय) (15 मिनीटे). लोकनृत्यासाठी सहभाग संख्या 20(साथीदारांसह), लोकगीतासाठी 6(साथसंगत अतिरिक्त), एकांकिका साठी 12 तर अन्य प्रत्येक बाबींसाठी सहभाग संख्या 1 अशी आहे.
स्पर्धकांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा राहील. वय दि. 12 जानेवारी 2021 रोजी किमान 15 व जास्तीत जास्त 29 असावे. दि. 12 जानेवारी 1992 ते 12 जोनवारी 2006 या कालावधीत जन्म झालेला असावा. स्पर्धकांने नांव नांदणी करताना प्रवेशासोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळा/महाविद्यालय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. स्पर्धेकाचे वय दि. 12 जानेवारी 2019 रोजी 15 ते 29 वर्षे दरम्यानचे असावे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही.
यासाठी आपले प्रवेश अर्ज दि. 24 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 04.00 वाजेपर्यंतच 1) श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी (व्हॉटसॲप नंबर – 9960486743) 2) श्री. अमित देसाई, (व्हॉटस ॲप नंबर – 8482860527) या क्रमांकावर व्हॉटस ॲपव्दारे व ईमेल- dsosport_sangli@rediffmail.com या मेलवर सादर करण्यात यावा. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर आपला व्हॉटसॲप नंबर असणे आवश्यक आहे.
ज्या स्पर्धकांचे अर्ज विहीत मुदतीत वरील व्हॉटस अप् नंबरवर तसेच ई-मेल वर येतील त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरिता स्पर्धकांच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास ऑलनाईन सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच आपले सादरीकरण करण्यात यावे. सादर केलेल्या बाबीची व्हिडीओ क्लिप तयार करुन dsosport_sangli@rediffmail.com या ई-मेल वर सादरीकरण झाल्यावर लगेचच पाठवावी.
कला सादर करतांना विद्युत पुरवठा खंडित होवून आपले सादरीकरणात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी स्पर्धकांनी स्वत: घ्यायची आहे. असे झाल्यास सर्वस्वी आपली स्पर्धकाची राहील. त्यामुळे शक्यतो लॅपटॉप / मोबाईलचा वापर करावा. परिक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याच वेळी आक्षेप ऑनलाईन सिध्द करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करतांना कोणत्याही प्रकारची इजा/ दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. ऑनलाईन कला सादर करतांना सहभागी कलाकारांनी आपल्या वयाचा मूळ दाखला सोबत ठेवावा. एका कलाकारास एका बाबीत फक्त एकाच वेळेस सहभागी होता येईल. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होवू शकणार नाहीत, असे श्री. वाघमारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.