शैक्षणिकसांगली

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २६ डिसेंबर पर्यंत

सांगली : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत दि. २२ ते २६ डिसेंबर २०२० आहे. प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह). पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करण्याची मुदत दिनांक २२ ते २७ डिसेंबर २०२० आहे. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्ग साठी २०० रूपये तर खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी १०० रूपये आहे.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून Approve करून घेतला आहे, परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरूस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज पूर्ण भरू शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्याआत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close