
भिलवडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय संपर्क शून्य होत असल्याने संपर्क नसलेलं जनसंपर्क कार्यालय आहे का, असा प्रश्न भिलवडी परिसरातील लोकांमध्ये निर्माण होत आहे.
स्व. मंञी पतंगराव कदम साहेब यांनी गरीब आणि सामान्य माणसाला योग्य न्याय देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे . प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि सामान्य माणसाला त्यांच्याच गावात त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची संकल्पना अस्तित्वात आणली. कदम साहेबांच्या विचाराचा वारसा जपणारे सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी त्यांच्याच नावाने प्रत्येक गावात जनसंपर्क कार्यालय उभारले. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगारही देण्यात आला आहे.
सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी कोण्या एका पक्षाचे आणि काही ठराविक लोकांची कामे करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केलेले आहे का, असाही प्रश्न नागरिकांना पडत आहे. नेहमीच या कार्यालयात एखादे काम घेऊन गेल्यानंतर एका कामासाठी किमान पाच वेळा यावे लागते. या पूर्वीचीही कामे याच पध्दतीने करण्यात आली आहे, असे येथे जाणार्या लोकांत बोलले जात आहे.
भिलवडी ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे. जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आदराची वागणूक दिली पाहिजे. निवडणुकीचे वातावरण असल्याने येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी येथे काम करण्याची इच्छा नसेल तर बदली करून घ्यावी. लोकांची दिशाभूल करण्याचा अधिकार यांना कोणी दिला आहे . ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बरेवाईट परिणाम काय झाला तर जनसंपर्क कार्यालयातीलच कर्मचारी यांना जबाबदार धरले जाईल, असा सवाल लोकांतून होत आहे.
सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी या जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळीच चांगला दम, ढोस द्यावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.