ताज्या घडामोडी

नव उद्योजकांच्या खंबीरपणे पाठिशी उभे राहणार : उद्योजक सी. आर. सांगलीकर

उद्योजकांच्यात चैतन्याचे वातावरण

सांगली : सांगली जिल्ह्यात मागासवर्गीय समाजाचे 1 हजार उद्योजक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी नवीन उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदत आणि मार्गदर्शन करणार, असे आश्वासन उद्योजक सी. आर.  सांगलीकर यांनी दिले.

सांगली येथे उद्योजक सांगलीकर यांनी नवीन उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी सांगलीकर यांनी नवीन उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या जीवनातील चडउतार सांगून जगात अशक्य कोणतीच गोष्ट नाही, प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने पुढे जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मला प्रेरणादायी ठरले आहे. माझ्याकडे भरपूर आहे,  पण मला सामाजिक बांधिलकी जपून माझ्या समाजासाठी काहीतरी वेगळे कार्य करायचे आहे. त्यासाठी नवीन उद्योजकांना मार्गदर्शन आणि मदत करणार, असेही त्यांनी सांगितले.

उद्योजक सांगलीकर यांनी केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणार आहेत.

यावेळी दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक अभिजित रांजणे, प्रदीप कांबळे,  सचिन इनामदार, सतिश कामत आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते,.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close