महाराष्ट्रसांगली

भिलवडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोणी पगार देता पगार..!

तारीख 20 ओंलाडली : ग्रामसेवकांचे सहीचा अधिकार नसल्याचे म्हणणे

 

संग्रहीत छायाचित्र

भिलवडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायत विविध विकास कामांच्याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पुढे आहे.माञ, नेहमीच आरडाओरडा करत काम करून घेणार्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना  आज 20 तारीख ओलांडून गेल्यामुळे कोणी  पगार देता पगार?  अशी बोंब मारण्याची परिस्थिती  निर्माण झाली आहे.

भिलवडी गावातील स्वतःला पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे.  गावातील इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुढे धावत असतात,  माञ,  तोडपाणी होत नसल्याने आणि  या कर्मचाऱ्यांना कामापुरते वापर करून सोडणार्या लोकांमुळे त्यांच्यावर दुर्दैवाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेत पगार न झाल्याने उसणवार आणि उधारीवर कर्मचारी जीवन जगत आहेत.
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक यांना विचारले असता आम्हाला सहीचा अधिकार नसल्याने गावातील कामे करता येत नाहीत. पगार दोन दिवसांत दिला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
ग्रामसेवक यांच्याकडे दोन गावाच्या ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने भिलवडी गावातील लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भिलवडीतील विकास कामांना मोठी खीळ बसत आहे.
भिलवडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close