खंडोबाचीवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे 20 एकर ऊस जळून खाक

भिलवडी : खंडोबाचीवाडी ता. पलुस येथे MSEB च्या शॉर्ट सर्किटमुळे 20 एकर ऊस जळाला आहे. या लागलेल्या आगीत शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
महापुर, कोरोनाकाळापाठोपाठ आता हे शेतकर्यांसमोर तिसरे मोठे संकट आ वासुन उभे राहिले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी 2.45 च्या आसपास विजय शिंदे, पांडुरंग खोत व अविनाश शिंदे यांच्या शेतावरून गेलेली MSEB ची तार तुटल्याने आगिच्या ठिणग्या पडल्या व ही आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने हा प्रसंग घडला.
या आगीत जळालेल्या ऊसासोबतच जनु शेतकरी देखील होरपळुन निघाला आहे असेच म्हणावे लागेल. कारखान्याने लवकरात लवकर हा ऊस घेऊन थ
जावा, अशी विनंती सर्व शेतकर्यांकडुन केली जात आहे. तसेच MSEB ने लवकरात लवकर याची नुकसान भरपाई द्यावी. यासाठी शेतकर्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
खंडोबाचीवाडी गावातील धाडशी आणि जिगरबाच नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, या नागरिकांमुळेच ही आग आटोक्यात आणता आली अन्यथा आगिचा आगडोंब आणखी उसळला असता.