प्रशांत लेंगरे यांची शिवसेना पलूस तालुका प्रमुखपदी निवड
शिवसैनिकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत ५१ किलो लाडूचे वाटप करून केला जल्लोष

पलूस : युवा नेते प्रशांत लेंगरे यांची शिवसेनेच्या पलूस तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत ५१ किलो लाडूचे वाटप करून जल्लोष साजरा केला.
यावेळी नूतन तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे यांचे सर्व शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यानिवडीनंतर बोलताना प्रशांत लेंगरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना समन्वयक दगडूदादा संपकाळ, शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानगुडे-पाटील आणि जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि आनंदराव पवार यांनी मला पुन्हा तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मला मिळालेल्या या संधीचे सोने करणार आहे. पलूस तालुक्यामधील सर्व शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्याना सोबत घेऊन पलूस तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ या शिवसेनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. येणारी पलूस नगरपरिषदेची निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुका पंचायत या समितीच्या ताकतीने लढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केलेले काम तसेच त्यांनी घेतलेली भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचे काम इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे.
यावेळी माजी सरपंच जयवंत डाळे, किरण पाटील, संजय हारूगडे, श्रीकांत लेंगरे, प्रवीण गलांडे, ओंकार पाटील, निलेश पवार, विशाल शिंदे, सुरज सूर्वे, महेश शिंदे, महेंद्र पोतदार अनिकेत डपळापुरकर, हरिष वडर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.