पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार विजय निश्चित : सुधीर भैय्या जाधव
दुधोंडी येथे महाविकास आघाडी उमेदवार प्रचार रॅलीत विश्वास

सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी राज्यातील महाविकास आघाडीकडून अरूण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांना पलूस
तालुक्यातून अधिकचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करून महाविकास आघाडी एकसंघपणे पलूस तालुक्यात प्रचाराची यंत्रणा राबवत आहे, आमच्यात कसल्याही प्रकारचे
गैरसमज नाहीत. विरोधकांच्या कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षक मतदार बंधूंनी या
दोघांच्या पाठीशी ठाम रहावे, असे आवाहन मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव ,
यांनी केले .
ते दुधोंडी(ता.पलूस) प्रचार रॅलीत सुधीर जाधव म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक अतिशय चुरशीने होत आहे. यासाठी जास्तीत जास्त मतदान होने गरजेचे आहे त्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन त्यांनी केले
पलूस तालुक्यात शिक्षक मतदार व पदवीधरांची संख्या मोठी आहे. यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस, राष्टवादी यांच्यासह मित्रपक्ष सर्वचजण एकजुटीने राबत आहेत. दुधोंडी गावामध्येही मतदारांमध्ये या दोन्ही उमेदवारांबाबत चांगले वातावरण आहे. पदवीधरचे उमेदवारनअरूण लाड यांना क्रांतीवीर जी. डी. बापूंचा वारसा आहे. तर शिक्षकांसाठी झोकून काम करणारे कोल्हापूरचे प्रा. जयंत आसगावकर यांच्या कामाची
ओळख शिक्षक मतदारांमध्ये आहे.
या दोन्ही उमेदवारांना मतदार पसंती
देतील यात शंका नाही. याा प्रचार रॅलीत सुधीर भैय्या जाधव पोपट काका जाधव व विविध मान्यवर सहभागी झाले होते.