महाराष्ट्रसांगली

धनगर समाजाची ताकद दाखवण्यासाठी धनगर नेते,समाज विजय लेंगरेंच्या मागे

सांगली : धनगर आरक्षणाच्या विषयावर प्रस्थापित चारही पक्षाने धनगर समाजाला फसवले आहे. भाजप-सेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या विरोधात धनगर समाजामध्ये रागाची भावना आहे. मेंढपाळ व धनगर आरक्षण चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष बिचुकले यांनी पुणे पदवीधर पदवीधर मतदारसंघातून ॲड. विजय शामराव लेंगरे यांना उमेदवारी अर्ज भरायला लावून पुणे पदवीधर मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे. युवा वर्गाने भाजप व महविकास आघाडीला विजय लेंगरे यांच्या पाठीमागे सर्वपक्षीय धनगर समाज नेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ताकद देत आहे. धनगर समाजाची ताकद दाखवण्याची संधी सोडायची नाही असा विचारच सर्वांनी केला आहे. परंतु दुसरीकडे गेल्या 3 वर्षात बिरोबाची खोटी शपथ घेणारे आपल्या भाषणातून मी प्रस्थापितांच्या विरोधात लढतो, प्रस्थापितांना विरोध करतो आहे. धनगराची 50 पोर आमदार खासदार करणार अशा वल्गना करणारे आमदार  पडळकर पदवीधर मतदारसंघात प्रस्तापित उमेदवाराचा प्रचार करण्यात व्यस्त आहे.  पडळकर यांचा खरा चेहरा समाजासमोर उघडा पडला आहे अशी खरमरीत टीका सामाजिक कार्यकर्ते संतोष बिचुकले यांनी केली  असून समाज बांधवांनी ॲड विजय शामराव लेंगरे यांचा प्रचार करून बहुजन समाजाची ताकद या प्रस्थापित पक्षांना दाखवण्याची संधी सोडू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close