महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार : जे के बापू जाधव
दुधोंडी येथे अरुण आण्णा लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ बैठक

पलूूस : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राबल्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून सिद्ध करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव यांनी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी,पदवीधर शिक्षक मान्यवर उपस्थित होते.
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे. के (बापू) जाधव म्हणाले, की महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही योग्य आणि कामाचे दिले आहेत, ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, त्यांच्या विजयात सर्वांचा सहभाग असेल, अफवा पासून दूर राहून सर्वांनी एकदिलाने काम करावे व विजयात सहभाग व्हावे, आपापल्या भागातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचून सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विचार पटवून सांगावेत,
यावेळी तासगावचे अरुण खरमाटे म्हणाले, की कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव यांनी आपणास निवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती केली होती, त्यांच्या आग्रहास्तव अर्ज माघार घेऊन आता महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत खरमाटे यांनी सांगितले.
युवा नेते सुधीर भैया जाधव, राजापूरचे डी ए माने सर, क्रांतिकुमार जाधव, उमेश लाड, क्रांती कारखान्याचे संचालक जयप्रकाश साळुंखे, माजी संचालक संभाजी साळुंखे, दुधोंडी सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ नागराज रानमाळे, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश रानमाळे, सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे व्हा चेअरमन भालचंद्र आरबुने, हिंदुराव कदम, भीमराव कदम, दिलीप जाधव, श्रीकांत कदम, संदीप पाटील, प्रशांत चव्हाण, संजय भोसले, प्रा विष्णू रोकडे, राजेंद्र नलवडे, प्रा संतोष मोहिते, शिक्षक उमेदवार जयंत आसगगावकर यांचे प्रतिनिधी प्रा आर एन पाटील, प्रा जी डी कुडाळकर, प्रा नितीन पोतदार, प्रा जनार्दन मोरावळे, सुरेश चव्हाण व परिसरातील आदी कार्यकर्ते व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.