“आप”चे डॉ.अमोल पवार यांचा विजयाचा मार्ग सुकर

सांगली : डॉ.अमोल पवार पदवीधर मतदार संघ पुणे या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान केलेल्या पाच जिल्ह्यांच्या ‘पदवीधर संवाद यात्रेस ‘ विविध संस्था, संघटना आणि मान्यवर व्यक्तींनी पाठिंबा दर्शविला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब कुलकर्णी यांची भेट घेतली असता. त्यांनी डॉक्टर अमोल पवार यांना जाहीर पाठिंबा दर्शविला तसेच सांगली जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पवार तसेच माजी उपाध्यक्ष एड. सुरेश चव्हाण यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. तसेच ऐळावी गावी झालेल्या 20 तारखेच्या मेळाव्यात उपस्थित असलेल्या 200 पदवीधर गावकऱ्यांनी एकमुखी निर्धार करून डॉ. अमोल पवार यांना पाठिंबा दर्शविला. तसेच लोकशाही वाचवा कृतिशील विचारवंत आणि महामार्ग संघर्ष समिती या संघटनांनीही त्यांना कृती कृतिशील पाठिंबा जाहीर केला. 2014 चे पदवीधर निवडणुकीतील उमेदवार व अमृतवेल मासिकाचे संपादक श्री. धर्मेंद्र पवार यांनी, “राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी डॉ.अमोल पवार यांना पाठिंबा देत आहे”,असे सांगितले.
सातारा येथे 22 तारखेला झालेल्या आम आदमी पार्टीच्या जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्राचे राज्य संयोजक माननीय रंगा राजुरी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय संदीप देसाई यांच्या उपस्थितीत आपच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल पवार यांचे जल्लोषात स्वागत केले.तसेच डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर च्या सर्व पदाधिकारी आणि संयोजक माननीय डॉ. संजय पुजारी यांनी “डॉ.अमोल पवार हे विज्ञानवादी विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळे मी त्यांना पाठिंबा देत आहे.”असे सांगितले. तसेच,”डॉ.अमोल पवार हे विवेकवादी विचारांचे पाईक आहेत म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत”,असे मत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते माननीय विजय मांडके यांनी मांडले.
22 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झालेल्या आप’च्या संकल्प मेळाव्यात ‘आप’कोल्हापूरचे अध्यक्ष निलेश रेडकर आणि शहर अध्यक्ष उत्तम पाटील यांनी डॉ.अमोल पवार यांना निवडणूकित निवडून देण्याचा संकल्प केला. यादरम्यान डॉ.अमोल पवार यांना तत्त्वज्ञान परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे सर यांनी पाठिंबा रुपी आशीर्वाद दिले.
सोलापूर येथे झालेल्या 23 व 24 तारखेच्या संवाद यात्रेत पंढरपूर तसेच सोलापूर डॉक्टर असोसिएशन यांनी जाहीर पाठिंबा दिला.तसेच सोलापूर वकील संघटना यांनी हि जाहीर समर्थन दिलं.साडेचार हजार सभासद असलेल्या ‘उमेद’संस्थेने आपले प्रश्न डॉक्टर अमोल पवार नक्कीच सोडवातील हा विश्वास असल्यामुळे त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.दौर्याच्या दरम्यान झालेल्या भेटीगाठीत अनेक शिक्षक -पदवीधरांनी अमोल पवार यांना जाहीर समर्थन दिले.तसेच माढा तालुक्यातील युवकांचे जबरदस्त जाळे असलेले संघटन म्हणजे श्रीमंत राजे प्रतिष्ठान यांनी आपला पाठिंबा दिल असताना असे विधान केले की “डॉ.अमोल पवार यांच्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाकडे आम्ही आकर्षित होऊन त्यांच्यासोबत कार्यरत राहणार आहोत.”
“संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ.अमोल पवार याना माझा पाठिंबा आहे व सर्व पदवीधरांनी त्यांना मत द्यावे.”असे जाहीर आव्हान संविधान व मानवाधिकार विश्लेषक एड. असीम सरोदे यांनी केले.अभिनेता मा.संदीप मेहता यांनी आपल्या व्हिडीओ देऊन ‘वोट फॉर वर्क’ चा नारा दिला. तसेच माजी सनदी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी “डॉ.अमोल पवार हे स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्व असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे.”असे विधान केले.ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार निखिल वागळे यांनी आपला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून,”लोकशाहीच्या संवर्धनासाठी डॉ.अमोल पवार यांना निवडून देणे आवश्यक आहे. ते कृतिशील व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते असून अशी व्यक्ती विधानभवनात जाणे आवश्यक आहे.”असे विधान असे मत केले.
डॉ.अमोल पवार यांच्या पाच दिवशीय पदवीधर संवाद यात्रेला पाचही जिल्ह्यातील डॉक्टर असोसिएशन,सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत,पत्रकार वकील,कलाकारांनी आणि सामाजिक संघटनांनी जनसमर्थन देऊन, अमोल पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.