ताज्या घडामोडी

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील गर्दी टाळण्याचे आवाहन

सांगली, दि. 25 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दि. ६ डिसेंबर हा दिवस साजरा करण्यासाठी देशभरातील लाखो लोक मुंबईमधील चैत्यभूमी येथे जमतात. यावर्षी कोविड-19 आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिन साजरा करताना आत्यंतिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी मुंबई येथे जाऊ इच्छिणाऱ्यांनी जिथे आहेत तेथूनच मन:पूर्वक अभिवादन करावे आणि चैत्यभूमीवर होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन यांनी केले आहे.
ज्या व्यक्तींचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार यासारखे अति जोखमीचे आजार आहेत शिवाय ज्यांना सध्या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत अशा मंडळींनी या स्वरूपाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे टाळावे. जी मंडळी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत त्यांनी कोविड प्रसार टाळण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटायझर अथवा साबण आणि पाण्याचा नियमित वापर, समूहामध्ये गर्दीमध्ये वावरताना दोन व्यक्तींमध्ये किमान दोन मीटर अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धूम्रपापन म्हणजे सिगारेट बिडी ओढणे, तंबाखू गुटका पान इत्यादी खाने आणि थुंकणे अशा गोष्टी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कायद्यानुसार गुन्हा आहे.
स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस विना मास्क सहभागी होण्यास प्रतिबंध करावा. कार्यक्रमाच्या प्रवेशव्दाराशी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल गनव्दारे तपासणी करून ताप असणाऱ्या व्यक्तीस कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखावे. कार्यक्रमाच्या परिसरात सिगारेट, बिडी, तंबाखू अशा धुम्रपानासाठी आवश्यक वस्तूंची विक्री होणार नाही यासाठी खबरदारी घेणे आणि कार्यक्रमाच्या ठिकाण धूम्रपान अथवा थुंकणे यास मज्जाव करावा. कोविड-19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपाययोजना करून मुंबईसह स्थानिक पातळीवर सर्व कार्यक्रम छोट्या स्वरूपात आणि विशेष गर्दी न होता तसेच जनसमूहाने कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करून होतील याबाबत योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close