सांगली

उद्योजक गिरीश चितळे यांच्याकडून भिलवडी शिक्षण संस्थेस 2 लाख 48 हजारांची देणगी

वाढदिवसाच्या निमित्त शिक्षण संस्थेस भरीव मदत : कै. काकासाहेबांच्या परंपरेची जपणूक

भिलवडी : मे.बी.जी.चितळे डेअरीचे संचालक व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक उद्योजक गिरीश चितळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भिलवडी शिक्षण संस्थेस दोन लाख अाठ्ठेचाळीस हजार रुपयाची देणगी दिली. स्वता:च्या वाढदिनी कोणताही कार्यक्रम साजरा न करता ते भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी देतात.वाढदिवसाच्या अंकात एक लाख रुपये मिळवून ती रक्कम देणगी म्हणून दिली जाते.गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी ही परंपरा सुरू केली आहे.२४ नोव्हेंबर रोजी त्यांचा ४८वा.वाढदिवस.त्यांनी १ लाख ४८ हजार रुपये देणगी दिली.तसेच स्वर्गिय काकासाहेब चितळे यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांनी एक लाख रुपये अशी एकूण दोन लाख अाठ्ठेचाळीस हजार रुपयाची देणगी दिली.
यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,काकासाहेब चितळे यांनी वाढदिवसाच्या निमित्त सामाजिक जाणिवेतून शिक्षण संस्थेस देणगी देण्याची परंपरा निर्माण केली आहे. या निधीचा वापर शिक्षण संकुलात अत्यावशक सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी केला जावा. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी देणगीचा स्वीकार केला.या देणगी बद्दल डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते बुके देऊन गिरीश चितळे यांचे संस्थेच्यावतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक प्रा.आर.डी.पाटील,सचिव संजय कुलकर्णी,मानसिंग हाके,प्रा.डॉ.सुरेश शिंदे, प्रा. डॉ. एम.आर.पाटील आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close