महाराष्ट्रसांगली

भाजप-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी कारभारापुढे ‘आप’चाच पर्याय: डॉ अमोल पवार

मिरज : मिरज येथे आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ अमोल पवार यांच्या प्रचारार्थ प्रमुख
पदाधिका-यांची बैठक, महाराष्ट्र राज्य प्रमुख रंगा राचुरे यांची प्रुमख उपस्थिती होती.आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे पदवीधर निवडणुकीतील उमेदवार डॉ अमोल पवार यांच्या प्रचारासाठी मिरज येथे बैठक संपन्न झाली.

डॉ अमोल पवार यांच्यासारखी स्वच्छ चरित्र्याची व्यक्ती निवडुन आलीच पाहिजेत आणि ही जबाबदारी स्विकारून आपन कामाला लागण्याची गरज आहे असे मत रंगा राचुरे यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ अमोल पवार यांनी भाजप-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी कारभारापुढे ‘आप’चाच पर्याय असल्याचे मत व्यक्त केले. आपन सर्वांनी पुढचे काही दिवस ताकदीने कामाला लागलो तर 100% परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला. पदवीधरांसाठी यंदा असा परिवर्तन करणा-या मानसाची गरज आहे. असा माणूस जर विधानपरिषदेत गेला तरच सत्ताधार्यांना पदवीधरांच्या समस्यांचा जाब विचारू शकेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ अमोल पवार यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ अमोल पवार यांना अनुकुल वातावरण आहे असे दिसुन येत आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.
सर्वांनी डॉ अमोल पवार यांना या पदवीधर निवडणुकीत विजयी करण्यासाठी जिवाचे रान करण्याची घोषणा केली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला,
सांगली जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधीकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close