दलितवस्ती कामांमध्ये कोणतीही वाढ दाखवली नाही : विजयकुमार चोपडे
भिलवडी प्रतिनिधी दि.20
अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकास कामाच्या योजनेअंतर्गत मंजूर कामांमध्ये कोणतीही अनियमितता नाही असा खुलासा भिलवडी गावचे तत्कालीन सरपंच विजयकुमार चोपडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
भिलवडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लोकवस्तीमध्ये राहत असलेल्या मागासवर्गीय वस्तीमध्ये विकास व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने ठराव घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना सादर केला असता पुणे आयुक्तांनी सदर आराखड्यास मंजुरी दिली आहे.त्या मंजूरीवरून जिल्हा परिषदेने दलितवस्तीसाठी हा निधी मंजूर केला आहे.जेथे निधी मंजूर झाला आहे पूर्ण दलितवस्तीसाठी हा निधी मंजूर आहे.जिथे हा निधी मंजूर झाला आहे, तिथे अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या निधीच्या निकषांमध्ये असून, या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अनियमितता नाही ,असे मत भिलवडी गावचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
चोपडे म्हणाले की,ज्या वस्तीमध्ये गेल्या 40 ते 50 वर्षांपासून मागासवर्गीय लोकांचे वास्तव्य आहे.सध्या या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार हि आहे. तरीदेखील जर अनुसूचित जाती जमातीसाठी काम करणे, तेथील विकास करणे ,नियम व आराखड्या प्रमाणे निधी मंजूर करून तेथील अनुसूचित जाती जमातीतील नागरिकाचा विकास करणे क्रमप्राप्त आहे हि जर चुक असेल तर अशा घटकांचा विकास होणार तरी कधी? असा प्रश्न विजयकुमार चोपडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
यावेळी उपसरपंच चंद्रकांत केंगार आदी उपस्थित होते.