मिरजेत स्वातंत्र्य सेनानी हजरत टीपू सुलतान यांची जयंती उत्साहात
मिरज : टीपू सुलतान जयंती महोत्सव समिती मिरज चे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांचे वतीने शुक्रवारी स्व. अहमदबाशा चौक मिरज येथे हजरत टीपू सुलतान यांची जयंती कोरोना चा अनुषंगाने साध्या पद्धतीने उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात आली.
हजरत टीपू सुलतान यांचे प्रतिमेस आर.पी.आय.(IT Cell) चे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्रभाऊ कांबळे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करणेत आले. आरपी.आय. चे युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे व भिम आर्मीचे माजी पश्चिम अध्यक्ष जैलाब शेख यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हजरत टीपू सुलतान यांचा विजय अशा घोषणा करण्यात आला.
यावेळी जैलाब शेख, योगेंद्रभाऊ कांबळे यांनी हजरत टीपू सुलतान यांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन केले.
यावेळी आर.पी.आय.(आठवले) चे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, गुलामरसूल शेख,मेहबुब शेख,अकबर शेख यांचे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.*