भाजप सरकारला आपण नक्की धडा शिकवू : विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर
माण येथे अरूण आण्णा लाड यांचा जोरदार प्रचार
सातारा : प्रतिनिधी
माण तालुक्यातून महा विकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांना नभुतो अशा मते मिळवणेस प्रयत्नशील राहू आणि खोटी आश्वासने देऊन आलेल्या भाजपा सरकारला आपण नक्की धडा शिकवू,असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले.
ते येथे पुणे पदविधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अरुण गणपती लाड यांच्या पदवीधर मतदान नियोजन संदर्भात दहिवडी येथे माण तालुक्याची सभा पार पडली त्यात बोलत होते.
यावेळी बाळासाहेब पाटील पालकमंत्री सातारा जिल्हा, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल माने यांची भाषणे झाली आणि स्व जी डी बापूंचा वारसा असणाऱ्या या उमद्या नेतृत्वाची जिवाचं रान करण्याची तयारी सर्वांनी दर्शवली.
यावेळी किरण लाड म्हणाले, आम्ही आजवर पक्षाच्या बाजूने प्रामाणिक काम केले याचीच हि पोहोच पावती आहे या मिळालेल्या संधीचे आपण सोनं करूया, पदविधारांची जाण असलेला आपल्या हक्काचा माणूस निवडून देऊया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रभाकर देशमुख माजी कोकण आयुक्त, तेजस शिंदे सातारा जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष, एम के भोसले काँग्रेस तालुका अध्यक्ष, संजय भोसले उपजिल्हा प्रमुख शिवसेना, डॉ. संदीप पोळ, कविता म्हेत्रे राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष, दादासाहेब काळे काँग्रेस महाराष्ट्र युवक सरचिटणीस , श्रीराम पाटील माजी उपसभापती, मनोज पोळ जिल्हा परिषद सदस्य, संदीप मांडवे माजी सभापती खटाव, बाळासाहेब माने, तानाजी कट्टे उपसभापती, प्रशांत वीरकर, सुनिल पोळ चेअरमन सिद्धनाथ पतसंस्था , युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब सावंत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष,नकुसाताई जाधव, छाया बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी महिला अध्यक्ष, हर्षदाताई देशमुख – जाधव प्रमुख उपस्थित होते.