महाराष्ट्रसांगली

भिलवडी येथील किल्ला स्पर्धा उत्साहात

स्पर्धेचे बक्षीस वितरण 30 नोव्हेंबर रोजी

भिलवडी  : भिलवडीत व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ला स्पर्धा शिवमय वातावरणामध्ये  झाल्या. या स्पर्धेसाठी विक्रमी 38 स्पर्धकांनी भाग घेतला होता. किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण  दिनांक 30 नोव्हेंबर रोजी  भिलवडीतील ऐतिहासिक कृष्णा घाटावर होणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी येथील बालचमूंनी मोठी तयारी केली होती.वैयक्तिक आणि गावातील मंडळांनी सुद्धा हुबेहूब किल्ल्याची प्रतिकृती व्हावी यासाठी भरपूर प्रयत्न केले होते.बरेच स्पर्धक मावळ्याच्या पोशाखांमध्ये ही तयार होते.काही मंडळांनी तोफेची सलामीही दिली.
परीक्षण करताना तयार केलेल्या किल्ल्यांची माहिती आणि परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे स्पर्धक देत होती. तानाजी मालुसरे,शिवा काशीद यांचा पराक्रम काहींनी सांगितला तर काहींनी पोवाडे गायले. या वर्षीच्या स्पर्धेत महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता.
अवधूत मोकाशी,अर्शद तांबोळी,गंधर्व पाटील,प्राजक्ता बावधनकर,शंतनू मोकाशी निखील गोरे,सोहम पाटील,उज्ज्वल कुलकर्णी यांनी उत्कृष्ट माहिती दिली.
परीक्षक म्हणून अमोल वंडे,किरण पाटील करत मोटकट्टे यांनी काम पाहिले.
दीपक पाटील समीर कुलकर्णी यांनी व्यापारी संघटनेच्या वतीने संयोजन केले.
उपाध्यक्ष रणजीत पाटील, सचिन नावडे या वेळी उपस्थित होते.
किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक 30 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक कृष्णा घाटावर होणार आहे. यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close