आकुर्ङेतील त्रिमुर्ति विकास सेवा संस्थेचा सभासदानां 5 टक्के लाभांश वाटप
कोल्हापूरःआनिल पाटील
आकुर्डे ता. भुदरगड येथील त्रिमुर्ती विकास संस्थेच्या वतीने ५ % प्रमाणे सभासद भागभांडवलावर लाभांश (डीव्हीडंट ) वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक म्हणाले २००९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन केला असून गतवर्षी संस्था स्थापनेस १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभासदांना भेटवस्तू रुपाने जाजम भेट देण्यात आले होते व ५ % लाभांश ही दिला होता.ही परंपरा कायम राखत या वर्षीही संरथेने लाभांश दिला आहे. प्रत्येक वर्षी सभासदांची १oo% वसुली होत असून सभासदांच्या विश्वासावर संस्थेचे कामकाज सुरू आहे.
यावेळी चेअरमन रवींद्र पाटील, व्हा. चेअरमन सुरेश सुतार, संचालक युवराज लोहार, ज्ञानदेव कुंभार, धनाजी कांबळे, शकुंतला कुंभार, विद्या भोसले, रामचंद्र शेणवी, बाजीराव भंडारी, कृष्णात जाधव नामदेव पाटील, दिलीप शेणवी , शामराव पाटील, सीताराम पोवार, विठ्ठल भोकरे, यांचे सह सभासद उपस्थित होते.
स्वागत सचिव सचिन शिंदे यांनी केले. आभार संदीप पोवार यांनी मानले.