दुधोंडी येथे गुरुवारी जे के बापू (जाधव) यांच्या मार्गदर्शनात बैठक
पदवीधर, पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन : अरूण आण्णा लाड यांचा जोरदार प्रचार
पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण आण्णा लाड यांच्या प्रचारार्थ क्रष्णाकाठ उद्योग समूहाचे आणि मानसिंग बँकेचे सर्वेसर्वा जे के बापू (जाधव ) यांच्या मार्गदर्शनाखाली दुधोंडी येथे बैठकीचे आयोजन केले आहे. बैठक सायंकाळी 6 वाजता मानसिंग बँक दुधोंडी येथे होणार आहे.
नेहमीच जे के बापू यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहुन सामान्य माणसाला आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. आजरोजीही पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार अरूण आण्णा लाड यांच्या प्रचारार्थ मानसिंग बँक दुधोंडी येथे बापू यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस दुधोंडी येथील पदवीधर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सुधीर भैया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते बैठकीचे जोरदार नियोजन करीत आहे.