कोण आहेत अरुण अण्णा लाड ?
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मोजक्या सहकाऱ्यांसह प्रतिसरकार ची स्थापना केली . प्रतिसरकार म्हणजे सरकारच्या जुलमी राजवटीला विरोध करणारी प्रतियंत्रणा . त्या प्रतिसरकरच्या सशस्त्र तुफानी सेनेचे सरसेनापती होते क्रांतीअग्रणी फिल्डमार्शल जी.डी. बापू लाड म्हणजेच अरुण अण्णांचे वडील. प्रतिसरकार मध्ये काम करत असल्यामुळे जी.डी. बापू सतत भूमिगत राहत. लग्नानंतर जी.डी बापूंच्या पत्नी म्हणजेच अण्णांच्या मातोश्री विजयाताई लाड या ही स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाल्या त्यामुळे त्यांनाही भूमिगत रहावे लागे . त्याचवेळी अरुण अण्णा विजयाताईंच्या गर्भात होते. अण्णांचा जन्म व्हावा की नाही याबाबत जी.डी बापू व विजयाताई यांच्या मनात संभ्रमावस्था होती . परंतु नियतीच्या मनात जनतेला आणखी एक लोकनेता मिळावा हे होत . देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात २९ ऑक्टोबर १९४७ दिवशी अण्णांचा जन्म झाला. कदाचित नियतीच्या मनात हेही असावं की आता देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण अण्णांच्या रूपान इथल्या कष्टकरी , श्रमिक वर्गाची सुद्धा पिढ्यानपिढ्यांच्या जाचातून सुटका व्हावी. स्वातंत्र्यानंतरही जी.डी. बापू शेतकरी , कष्टकरी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी दौरे करत फिरत त्यामुळे अण्णांना बाल्यावस्थेत बापूंचा सहवास फार कमी लाभला. १९५७ साली जी.डी बापू तासगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९६२ ते १९६८ या काळात बापू विधानपरिषदेवर निवडून गेले.अश्या या क्रांतीसूर्याच प्रतिबिंब म्हणजे अरुण अण्णा लाड. अरुण अण्णांनी बी.एस्सी अँग्रीचे शिक्षण पूर्ण केले ते अभ्यासात खूप हुशार होते. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी दशेत असताना अरुण अण्णांनी पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे काम विध्यार्थीनेता म्हणून पाहिले. विद्यार्थ्यांचे लढे उभे केले इथूनच त्यांच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली . संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळी दुष्काळाच्या सावटाखाली होता त्यावेळी अण्णांनी विद्यार्थ्यांची फी माफ केली जावी यासाठी आंदोलने उभी केली व ती यशस्वी करून दाखवली. तसेच विद्यार्थ्यांना डोनेशन मुक्त व्यवसायिक शिक्षण बेरोजगारांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नोकरी यासाठी अण्णांनी भरीव प्रयत्न केले.ही विद्यार्थी आंदोलने उभारत असताना अण्णांनी आर्थर रोड जेलमध्ये तुरुंगवास सुद्धा भोगला.
कृषी महाविद्यालयातून बीएस्सी पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर तरुणांनी कृषी पदवीधर संघाची स्थापना केली तसेच अनेक पुरोगामी संघटनांमध्ये काम चालू केले. समाजवादी प्रबोधनी ,विद्रोही सांस्कृतिक चळवळ, प्रगतिशील लेखक संघ परिवर्तनवादी साहित्य संमेलने, चर्चासत्र असे अनेक उपक्रम वेगवेगळ्या संघटनेमार्फत घेतले. शिक्षण पूर्ण होताच बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया या नॅशनल बँकांचे दरवाजे अण्णांना नोकरीसाठी खुले झाले परंतु माझा मुलगा कृषीपदवीधर आहे त्याने शेतीच केली पाहिजे हा जी.डी. बापू लाड यांचा अट्टाहास होता त्यामुळे अरुण अण्णांनी शेतीत लक्ष घातले परंतु १९७२ साली मोठा दुष्काळ पडला त्यावेळी बापूंनी भागीदारीत भोसरीत दुधाच्या कॅन निर्मितीचा व्यवसाय सुरू केला तो अण्णांनी पूर्ण लक्ष घालून सांभाळला परंतु काही कारणास्तव त्या व्यवसायात यश मिळाले नाही. त्यानंतर अण्णा घरची शेती बघत १९७३ पासून गांधी एज्युकेशन सोसायटीचे काम बघू लागले. मुलांकडून किंवा नोकरीला लावण्यासाठी शिक्षकांकडून एकही पैसा घ्यायचा नाही हे तत्व अण्णांनी त्यावेळीही जपल त्यामुळे गांधी एज्युकेशन सोसायटीचा त्यांनी मर्यादित विस्तार केला.पुढे अरुण अण्णांनी परिसरातील लोकांची शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे व खतांसाठी होणारी फरफट लक्षात घेऊन बी-बियाणे व खतांचे कृषी सेवा केंद्र सुरू केले परंतु दुकानातील नफ्याची सर्व रक्कम जी.डी बापूंच्या दौऱ्यांवर खर्च होत होती परंतु त्याची फिकीर ना अरुण अण्णांना होती ना कुटुंबियांना खिशातील पैसे घालून देशसेवेचा यज्ञकुंड अखंड तेवत रहावा यासाठी लाड कुटुंबातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत होता.
शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून अण्णांनी प्रसंगी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतीअग्रणी जी.डी बापू लाड सहकारी साखर कारखाना या नावाने एक आदर्श सहकारी साखर कारखाना अण्णांनी उभा केला. तसेच या कारखान्यांमार्फत वेगवेगळे उद्योग चालू केलेले आहेत तरुणांना प्राधान्य दिले जाते.कंपोस्ट खत निर्मिती माती प्रशिक्षण परीक्षण प्रयोगशाळा बियाणे प्लॉट, असे अनेक उद्योग या कारखान्यामार्फत चालतात.
तसेच गांधी एज्युकेशन सोसायटीचा आता प्रतिनिधी हायस्कूल कुंडल,कन्या शाळा कुंडल, श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी अंबक, जे एम करपे हायस्कूल शिरढोन बोरगाव, शहीद सुरेश चव्हाण हायस्कूल करोली टी असा व्याप आता वाढला आहे. गांधी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आज पाच माध्यमिक विद्यालय, एक प्राथमिक शाळा, क्रांती अग्रणी जी डी बापू लाड महाविद्यालय, क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल तसेच व्यवसाय अभ्यासक्रम, उच्च माध्यमिक विभाग, संगणक अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह आदींचे शैक्षणिक संकुल अरुण अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहेत.
अण्णांनी महिला सबलीकरणासाठीही सशक्त प्रयत्न केले आहेत. अण्णा म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ आहे जिथं कुठलाही भेदभाव नाही.
पुरोगामी विचारांचे अण्णा कुठलाही धर्म , जात असा भेदभाव मनात कधीच बाळगत नाहीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी अश्याप्रकारचे अण्णांचे राहणीमान आहे.
असे हे कार्यक्रांतीसूर्य अण्णा आपल्याला पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून लाभलेले आहेत. त्यांना प्रथम क्रमांकाच्या पसंतीची भरघोस मते देऊन त्यांना निवडून देणं आपणा सर्वांच कर्तव्य आहे. मागच्या आमदारांनी पदवीधरांना केवळ आश्वासनाची गाजर दाखवत आपल्या स्वार्थासाठी पिळून घेतलं. पण अण्णांचा स्वभाव अगदी ऊसा सारखा आहे म्हणजे पिळून पिळून उसाचा चोथा झाला तरी तो गोडवा द्यायचा थांबत नाही. त्यामुळे अश्या लोकनेत्याला पडविधरांचा आमदार बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या घरातील उमेदवार म्हणून अण्णांना निडून द्या.