ताज्या घडामोडी

भिलवडीत पुन्हा होणार राज्यस्तरीय व्हाॅलीबॉल स्पर्धा

आजी,  माजी खेळाडूंनी मैदान स्वच्छ करून केला संकल्प

भिलवडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी  येथील आजी-माजी व्हाॅलीबाॅल खेळाडूंनी एकत्र येऊन पुन्हा एकदा व्हाॅलीबॉलच्या मैदानाचे पुनर्जीवन करण्याचा मानस केला असून,त्याचा शुभारंभ भिलवडी येथील जयभवानी क्रीडांगण करण्यात आला. त्यामुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. भिलवडी येथे पुन्हा एकदा राज्यस्तरीय व्हाॅलीबॉल स्पर्धां घेण्याचा अनेकांनी आपल्या भाषणातून संकल्प केला आहे.

कृष्णा नदीकाठी वसलेल्या भिलवडी गावातून आजपर्यंत अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे.भिलवडी येथे होणारी राज्यस्तरीय व्हाॅलीबॉल स्पर्धा हि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत होती.या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज संघ सहभागी होत असत.दिवसरात्र अत्यंत चुरशीने व नियोजनबद्ध होणारे व्हॉलीबॉल खेळाचे सामने पाहण्यासाठी व्हाॅलीबाॅल प्रेमींची मोठी उपस्थिती असायची परंतू २००३/२००४ सालापासून या स्पर्धेला घरघर लागली तेंव्हा पासून आज अखेर म्हणजे सुमारे १६ ते १७ वर्षे झाली या स्पर्धा खंडित झाल्या आहेत.परंतु या स्पर्धा खंडित होत असल्याची खंत आजी माजी व्हॉलीबॉल खेळाडूंना वाटत होती.त्याचबरोबर २००५ व २०१९ साली आलेल्या महापुरामुळे या क्रिडांगणाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली होती.मैदानावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाडवेलीसह घाणीचे साम्राज्य पसरले होते. ठिकठिकाणी खड्डे पडले होते .त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या क्रिडांगणावर खेळाडूंना खेळताच येत नव्हते.म्हणूनच नवोदित युवा खेळाडूंबरोबरच सिनियर खेळाडूंनी एकत्र येऊन पुन्हा एकदा सदर व्हाॅलीबॉलचे मैदान स्वच्छ व दुरूस्त करून त्याच्यावरती सराव करण्याचा निश्चय केला.सदर मैदान दुरूस्त झाल्यानंतर त्याचा सर्वात जास्त फायदा हा युवा खेळाडूंना होणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

जयभवानी क्रीडांगण  स्वच्छता अभियान शुभारंभ प्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र ( भैय्या) वाळवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम (दादा) पाटील, उद्योजक गिरीश चितळे, सेवानिवृत्त क्रिडाशिक्षक मोहन पाटील सर,एम.टी.देसाई,एम.आर.पाटील,राजू मोहिते,जावेद तांबोळी,मुस्सा शेख, सरडे सर, ए.टी.पाटील, महावीर वठारे ,संतोष मगदुम, संभाजी महिंद,विजय पाटील, शशिकांत वंडे यांच्यासह आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close