ताज्या घडामोडी
पदवीधर मतदारसंघासाठी 37,शिक्षकासाठी 16 अर्ज दाखल
17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
सांगली : बुधवार दि. 11 नोव्हेंबर अखेर पर्यंत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 37 उमेदवारांनी तर शिक्षक मतदारसंघासाठी 16 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही मतदारसंघासाठी आज गुरूवार शेवटचा दिवस आहे.
उमेदवार अर्जाची छाननी 13 नोव्हेंबरला होणार असून 17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Share