राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून भिलवडी बाजारपेठेतील रस्त्याची दुरुस्ती
भिलवडी : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेतील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.
भिलवडी ता.पलूस येथील मुख्य बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे खराब झालेला होता.सदर रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते.त्यामुळे या रस्त्यावर वरचेवर लहान मोठे अपघात होत होते.भिलवडीहून सांगली, तासगाव, आष्टा,इस्लामपूर, कोल्हापूरला जाणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे सदर रस्त्यावरती नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत होती.वाहनाच्या चाकाखाली येणारे खडे व धुळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने भिलवडी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही याचा मोठा या त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे भिलवडीतील व्यापारी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना सदर रस्ता दुरुस्त करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती. सदर मागणीस अनुसरून वारंवार पाठपुरावा केल्यामुळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले आहे.मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे भिलवडी व्यापारी संघटनेकडून कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे आभार मानण्यात येत आहेत.