ताज्या घडामोडी
भिलवडीत शनिवारी रक्तदान शिबिर
भिलवडी : भिलवडी व्यापारी संघटना आणि भिलवडी परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने शनिवार दि. 7 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिर उत्तर भाग सोसायटीची नवीन इमारत येथे होणार आहे.
सध्या रक्ताची टंचाई जाणवत असल्यामुळे आपण सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र, कार्ड असेपर्यंत रक्तदात्याला व नातेवाईकांना मोफत रक्त देण्यात येईल.
प्लाझ्मा,प्लेटलेट रक्तातील तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी (उपलब्ध असल्यास) हे रक्तातील घटक सुद्धा मोफत दिले जाणार आहेत.
Share