ताज्या घडामोडी

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध  : डॉ नीलकंठ खंदारे

सांगली : प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, बदलीतील राजकीयकरण आणि नोकरीतील समस्या या समस्या कोणत्याही आमदाराने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही मात्र त्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी पुणे विभाग पदवीधर साठी माझी उमेदवारी असेल असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ निलकंठ खंदारे यांनी केले आहे.

प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे ज्या कामासाठी कामासाठी त्यांची नेमणूक झाली आहे त्याच्या विरोधात आहेत, त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो तसेच समाजातील शैक्षणिक प्रतिष्ठा कमी होण्यास कारणीभूत आहे. बदल्या मध्ये होणारा गैरवाजवी राजकीय हस्तक्षेप त्यांचे मानसिक संतुलन विचलित करू शकते. या प्रश्नाखेरीज व्यावसायिक महाविद्यालयात पगार व सेवाशर्ती संबंधी आपले पुणे पदवीधर मतदारसंघात मुख्य मुद्दे राहणार आहेत त्यामुळे माझ्यासारख्या गेली २५ वर्षे शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वांनी ठाम राहावे मी त्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन असे आवाहन डॉ.निलकंठ खंदारे यांनी केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात प्रा डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी ही शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ आणि सोलापूर व पुणे विद्यापीठाशी संलग्न शिक्षक संघटना तसेच इतर २० पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर आणी राजकीय संघटना यांच्या पाठिंब्याने जाहीर केली आहे. डॉ खंदारे हे शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून गेली २५ वर्षे ते शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. ते स्वतः विनाअनुदानित आणि नेट सेट ग्रस्त सारख्या समस्यातून गेले आहेत त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून त्यांच्या पुणे पदवीधर च्या उमेदवारी कडे पाहिले जात आहे. प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, बदल्यातील राजकीयकरण यावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे. जुनी पेन्शन मिळवणे, तासिका तत्त्वावरील शिक्षक, विनाअनुदानित अंशतः अनुदानित घोषित आणि अघोषित अनुदानाच्या संदर्भात न्याय देण्यासाठी आपण विधीमंडळात निकराचा लढा देऊन शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना वेठबिगाराप्रमाणे राबवून घेण्यात येते, त्यांना वेळेवर पगार मिळत नाही, विद्यापीठाची मान्यता मिळत नाही, फंड आणी ग्रँचुईटी मिळत नसल्याने त्यांच्या आयुष्याला कसलीही स्थिरता मिळत नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नेट सेट चा प्रश्न, त्यांच्या पेन्शन चा प्रश्न, पीएचडी च्या वेतनवाढी असा समस्यांचा डोंगर असल्याने त्यांची पदवीधर ची उमेदवारी या सर्वांना न्याय देण्याची राहील. 
डॉ खंदारे यांनी पुणे पदवीधर साठी 1लाख पेक्षा जास्त नावनोंदणी केली असून ५ जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. सर्व शिक्षक आणी पदवीधर एकत्र येऊन या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवण्यासाठी आपल्या पाठीशी राहिले तर आपण निश्चितच ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांच्या सहकारी पदवीधर व शिक्षकांना वाटतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close