ताज्या घडामोडी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) सोशल मीडिया आयटी सेलच्या पलूस तालुका अध्यक्षपदी रुपाली कांबळे यांची निवड
भिलवडी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) सोशल मीडियाआयटी सेलच्या पलूस तालूका अध्यक्ष पदी भिलवडी पंचशीलनगर येथील रुपाली नंदकिशोर कांबळे यांची निवड करण्यात आली. या निमित्ताने त्यांचा RPI (A) च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पलूस तालुका अध्यक्ष राजेश आण्णा तिरमरे, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी अध्यक्ष बोधिसत्व माने, पलूस तालुका उपाध्यक्ष देवदास कोकळे,पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविराज काळीबाग,पञकार पंकज गाडे आदी उपस्थित होते.
Share