सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा 29रोजी सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. २८ : राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील गुरूवार दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता कराड येथून आटपाडी कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता धनंजय विष्णु देशमुख यांच्या मुलीच्या साखरपान कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – जावळे मल्टीपर्पज हॉल आटपाडी. दुपारी 1.45 वाजता शिक्षण सेवक सह. सोसा.लि. सांगली शाखा आटपाडी कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शिक्षण सेवक सह. सोसा. लि. सांगली शाखा आटपाडी नूतन वास्तू उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – डॉ. हंकारे यांचे समर्थ हॉस्पिटल शेजारी, बाजार पटांगणाजवळ, कलेश्वर मंदिर हॉल आटपाडी. सोईनुसार ग्रामपंचायत आटपाडी सदिच्छा भेट, स्थळ – ग्रामपंचायत आटपाडी. दुपारी 4 वाजता आटपाडी येथून कराड कडे प्रयाण.