कृषी

वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टी.एम.सी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 104.29 (105.25), धोम 13.50 (13.50), कण्हेर 10.09 (10.10), वारणा 34.40 (34.40), दूधगंगा 25.39 (25.40), राधानगरी 8.18 (8.36), तुळशी 3.46 (3.47), कासारी 2.76 (2.77), पाटगाव 3.71 (3.72), धोम बालकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.95 (9.97), तारळी 5.75(5.85), अलमट्टी 123.08 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, कण्हेर 574, वारणा 756, दुधगंगा 700, राधानगरी 400, तुळशी 128, कासारी 250, पाटगाव 300 व अलमट्टी धरणातून 58 हजार 198 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची सकाळी 8 वाजेपर्यंतची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 7.2 (45), आयर्विन पूल सांगली 11 (40) व अंकली पूल हरिपूर 16.9 (45.11).
गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close