ताज्या घडामोडी

बार्टीमार्फत महत्वाच्या अभ्यासक्रम पूर्व परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण आयोजित करा : गजभिये

नागपूर, दि.22 : जेईई, निट या अभ्यासक्रमाकरिता व परदेशातील उच्च शिक्षणाकरिता जीआरई, टॉफल, आयईएलटीएस या पूर्व परीक्षेची तयारीसाठी निशुल्क प्रशिक्षण राबविण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे सदस्य सचिव तथा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी दिशानिर्देश देताना ते बोलत होते. यावेळी बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य तसेच हिन्दी व मराठी भाषेतील उपलब्ध साहित्याचे इंग्रजी भाषेत रुपांतर करुन जगभरातील नामांकित विद्यापीठामध्ये संशोधनास उपलब्ध करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.
समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, लेखाधिकारी शिलसागर चहांदे, प्रकल्प संचालक प्रशांत वासनिक, बार्टी प्रादेशिक कार्यालयाचे प्रकल्प संचालक पंकज माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान अंतर्गत राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या विविध भविष्यकालिन प्रस्तावित उपक्रमावर सखोल व सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. गजभिये यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन बादल श्रीरामे यांनी केले तर आभार प्रकल्प संचालक पंकज माने यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close