भिलवडी पोलिस ठाण्याचे सिघंम कैलास कोडग कोरोनामुक्त.
पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत
भिलवडी : येथीील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी कोरोनावर मात केली असून, पुन्हा एकदा ते जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यामुळे त्यांच्यावरती घरीच होम आयसोलेशन मध्येच उपचार सुरू होते.कोरोनाचा प्रादर्भाव वाढू नये.यासाठी लोकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सोळा गावांमध्ये चोख नियोजन करून तसेच शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कायद्याचा बडगा उगारून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या, विनाकारण अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या,विना मास्क तसेच दुचाकी, चारचाकी मधून प्रवास करताना शासन नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त लोकांना कायदेशीर धडा शिकवणारे तसेच कोरोनाचे गांभीर्य लोकांना पटवून सांगणारे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांना स्वत: लाच जनसेवा करता,करता जनसंपर्कातून कोरोनाची लागण झाली होती.परंतु हा कोविड योद्ध्या कोरोनावर मात करून पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज झाला आहे. भिलवडी गावचे तलाठी गौस महंम्मद लांडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांचे पुष्पहार घालून तसेच भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन व पोलीस बांधवांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.यावेळी भिलवडी ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी कार्यालयाचा सर्व सेवक वर्ग व पोलीस बांधव उपस्थित होते.