महाराष्ट्र

राज्यमंत्री यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल : एकनाथ शिंदे.

राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न.

मुंबई, दि. १८ : राज्यमंत्री यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल असे गौरोद्गार नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे आज कोविड सेंटरचा लोकार्पण प्रसंगी काढले. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरचे लोकार्पण नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने मुंबईत झाले. यावेळी ते बोलत होते, कोणत्याही शासकीय निधी शिवाय लोकसहभागातून उभारण्यात आलेले हे सेंटर अतिशय आद्ययावत असून कोविड काळात याची खूपच आवश्यकता होती. ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोना विरोधात प्रत्येकाला लढायचे आहे, त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या संकल्पनेतील माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिलेल्या सूचना पाळून आपण कोरोना सारख्या जागतिक महामारी विरोधात यशस्वी पणे लढा उभारू असे श्री. शिंदे म्हणाले.

जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री संजय पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन तसेच शिरोळ तालुक्यातील, जयसिंगपूर परिसरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सौजन्याने सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट सभागृह जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत. त्यामुळे व शहरातील व शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, दत्त साखरचे चेअरमन श्री. गणपतराव पाटील, जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाई‍क, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार अर्पणा मोरे- धुमाळ, शिरोळ पं.स.सभापती कविता चौगुले, ग. वी. अधिकारी शंकर कवितके, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व मान्यवर उपस्थित होते.

तर स्वामी समर्थ सेवा केंद्र जयसिंगपूर, दानचंद घेाडावत फामिली चॅरीटेबल ट्रस्ट जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरोळा तालुका कर्मचारी, सिध्दिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, जयसिंगपूर, डॉ. ओमप्रकाश जैन (हुबळी), उद्योजक प्रवीण इंगळे, युवराज शहा, प्रवीण बलदवा, चेतन चौधरी, दिपक चौधरी, माजी नगराध्यक्षक अमरसिंह निकम, राजेश मालू, आनंद मनियार,आयडीबीआय बँक शाखा, जयसिंगपूर अरूणा रोड गणेश उत्सोव मंडळ ३री गल्ली जयसिंगपुर विजयालक्ष्मी गणेशोत्सोव मंडळ ५वी गल्ली, जयसिंगपूर, गांधी रोड गणेशोत्वस मंडळ ७वी गल्ली, जयसिंगपूर जय भारत कला क्रिडा मंडळ ४ थी गल्ली, जयसिंगपूर, व्ही. बॉइज चौक शाहू नगर जयसिंगपूर, साई फिटनेस जिम, जयसिंगपूर, कल्याणसिंग रजपूत तसेच जयसिंगपूर नगर पालिकतील राजश्री शाहू विकास आघाडी व ताराराणी आघाडीच्या नगरसेवक/ नगरसेविका यांच्या देणगीतून हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने आणि योग्य उपचार मिळणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close