जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते “अनुराधा” पुस्तकाचे प्रकाशन

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्या पत्नी प्रा. अनुराधा दिलीपराव पाटील यांनी लिहिलेल्या “अनुराधा” या पुस्तकाचे प्रकाशन जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभास सोलापूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव (आण्णा) पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, इस्लामपूर पोलिस स्टेशनचे अधीक्षक कृष्णात पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रकुमार पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या महिला अध्यक्षा छायाताई पाटील, तालुक्यातून आलेले विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.