सांगली

अंकलखोप येथे कोव्हिड सेंटरचे उद्घाटन

भिलवडी : अंकलखोप व परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व सध्य स्थितीला अंकलखोप येथेही ८० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण असल्याने अंकलखोप मध्ये गंभीर वातावरण निर्माण झाले आहे.सध्या सांगली जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. परिणामी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या कोव्हिडं सेंटर मध्ये रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत.परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.याचे गांभीर्य ओळखून अंकलखोप ग्रामपंचायत, राजेश चौगुले फाउंडेशन, श्री.दत्त सेवाभावी मंडळ तसेच अंकलखोप लोकसहभागातून क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल अंकलखोप येथे कोव्हिडं सेंटरची उभारणी केली आहे.

शुभारंभ पलूसचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे,राजेश चौगुले,सरपंच अनिल विभूते,डॉ.विश्वास धेंडे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या कोव्हिडं सेंटरच्या माध्यमातून अंकलखोप गावामधील ज्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरी होम आयसोलेशन करण्याची सोय नाही अशा रुग्णावरती उपचार करण्यात येणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close