ताज्या घडामोडी

गरजू रूग्णांना तात्काळ बेड्स उपलब्ध करून द्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

आवश्यकता असलेल्या रूग्णांनाच डी.सी.एच. मध्ये ॲडमिट करा

सांगली, दि. 6 : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गरजू गंभीर रूग्णांना तात्काळ बेड्स उपलब्ध होण्यासाठी कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व ज्यांना लक्षणे नाहीत अशा रूग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ॲडमिट न करता तपासणीनंतर आवश्यकतेप्रमाणे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवण्यात यावे. ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांना ॲडमिट करून घ्येण्याची दक्षता रूग्णालयांनी घ्यावी. ज्या रूग्णांची प्रकृती स्थीर आहे, अशा रूग्णांना आवश्यक तपासणीनंतर तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देवून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवावे. याकामी तपासणी पथक व टास्क फोर्स टीमनेही प्रत्येक हॉस्पीटलमध्ये पहाणी करावी. ज्या रूग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये उपचाराची गरज नाही, असे रूग्ण बेड्स व्यापून ठेवणार नाहीत याची खात्री करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोरोना बाधित रूग्णांकरिता सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेड्सचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलचे डॉक्टर्स, तपासणी पथक व टास्क फोस्ट टीमसमवेत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल्सनी ज्या रूग्णांची प्रकृती स्थीर झाली आहे, अशा रूग्णांना हॉटेल, लॉज किंवा होस्टेलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत व त्या ठिकाणी उपचार द्यावेत. डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांचे उपचाराबाबत चांगल्या प्रकारे समुपदेशन करावे. प्रत्येक रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयात किती बेड्स आहेत, किती रूग्ण ॲडमिट आहेत व किती बेड्स शिल्लक आहेत याचा बोर्ड रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावून त्यावरील माहिती अद्ययावत ठेवावी. त्याचबरोबर बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम नियमितपणे रिअल टाईममध्ये अद्ययावत करावी. जेणेकरून रूग्णांना कोणत्या रूग्णालयात किती बेडस् उपलब्ध आहेत याची अद्ययावत माहिती मिळेल. जी रूग्णालये रूग्णांना ॲडमिट करून घेण्यासाठी डिपॉझीट मागतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. योग्य उपचार प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावे. याचे अनुसरण होते का नाही याची तपासणी पथक व टास्क फोर्स टीमने तपासणी करावी. काही त्रुटी आढळल्यास त्या संबंधितांच्या निदर्शनास आणून देवून त्यामध्ये सुधारणा करावी. रूग्णांच्या सद्यस्थितीबाबत त्यांच्या नातेवाईकांना रूग्णालयांनी दिवसातून किमान दोन वेळा माहिती द्यावी. ज्या रूग्णांचे नातेवाईक होम आयसोलेशन किंवा अन्य ठिकाणी असतील तर त्यांना टेलीफोनव्दारे माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close