सांगली

कोविड-19 : नागरिकांना ॲम्बुलन्स सेवा मिळण्यासाठी ॲम्बुलन्स कंट्रोल रूम : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

ॲम्बुलन्ससाठी मंजुर भाडे दरापेक्षा जादा आकारणी केल्यास कंट्रोल रूमकडे तक्रार करा

सांगली, दि. 30 : कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरिता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेलय ॲम्बुलन्स नागरिकांना माफक दरात व वेळवर मिळाव्यात याकरिता उप प्रादेशिक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2020 पासून ॲम्बुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे 24 x 7 करीता ॲम्बुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात येत असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. ज्या नागरिकांना खाजगी ॲम्बुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना या क्रमांकावर संपर्क साधून ॲम्बुलन्सचे बुकींग करता येईल. ॲम्बुलन्स बुकिंग केल्यानंतर संबधित नागरिकास ॲम्बुलन्स क्रमांक, चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक पुरवला जाईल. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलचे डॉक्टर्स यांनाही कंट्रोल रूम मार्फत ॲम्बुलन्स बुकींग करता येईल.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली यांनी ॲम्बुलन्स करीता मंजुर केलेले 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीताचे भाडे दर व कंसात 25 कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी 550 रूपये (11 रूपये), टाटा सुमो / मारूती इको / मॅटॅडोर सदृष्य वाहने 700 रूपये (14 रूपये), टाटा 407 / स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहने 900 रूपये (18 रूपये), ALS /आय.सी.यु. वातानुकुलीत वाहने 1200 रूपये (24 रूपये) आहे. ü
ॲम्बुलन्सचे चालक / मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास कंट्रोल रूमकडे तक्रार दाखल करावी. तक्रारीत रूग्णाचे नाव, ॲम्बुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close