सांगली

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात 1583 बेडस् ची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयांबरोबर खाजगी रूग्णालयेही कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत. अधिग्रहित करण्यात आलेल्या काही खाजगी रूग्णालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (MJPJAY) उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी 398 आयसीयु बेडस् तर 1185 वॉर्ड बेडस् अशा एकूण 1 हजार 583 बेडस् ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी हॉस्पीटलनिहाय उपलब्ध असलेले आयसीयु बेडस्, वॉर्ड बेडस् व एकूण बेडस् ची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोविड हॉस्पीटल मिरज) – आयसीयु बेडस् 96, वॉर्ड बेडस् 202 असे एकूण 298 बेडस् , भारती हॉस्पीटल सांगली (MJPJAY) – आयसीयु बेडस् 39, वॉर्ड बेडस् 111 असे एकूण 150 बेडस्, वॉनलेस हॉस्पीटल मिरज (MJPJAY) – आयसीयु बेडस् 30, वॉर्ड बेडस् 60 असे एकूण 90 बेडस्, वॉनलेस हॉस्पीटल मिरज (Paid) – आयसीयु बेडस् 10, वॉर्ड बेडस् 40 असे एकूण 50 बेडस्, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सांगली (Paid) – आयसीयु बेडस् 25, वॉर्ड बेडस् 45 असे एकूण 70 बेडस्, मेहता हॉस्पीटल सांगली (MJPJAY) – आयसीयु बेडस् 19, वॉर्ड बेडस् 33 असे एकूण 52 बेडस्, मिरज चेस्ट सेंटर मिरज (Paid) – आयसीयु बेडस् 20, वॉर्ड बेडस् 28 असे एकूण 48 बेडस्, सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल – आयसीयु बेडस् 30, वॉर्ड बेडस् 20 असे एकूण 50 बेडस्, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली (MJPJAY) – आयसीयु बेडस् 19, वॉर्ड बेडस् 24 असे एकूण 43 बेडस्, श्वास हॉस्पीटल (Paid) – आयसीयु बेडस् 14, वॉर्ड बेडस् 22 असे एकूण 36 बेडस्, दुधणकर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल (Paid) – आयसीयु बेडस् 11, वॉर्ड बेडस् 29 असे एकूण 40 बेडस्, अदिसागर SMKC DCHC – वॉर्ड बेडस् 120, उप जिल्हा रूग्णालय इस्लामपूर – आयसीयु बेडस् 10, वॉर्ड बेडस् 25 असे एकूण 35 बेडस्, सिव्हील हॉस्पीटल सांगली – आयसीयु बेडस् 22, वॉर्ड बेडस् 24 असे एकूण 46 बेडस्, विवेकानंद मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल बामणोली कुपवाड मिरज (MJPJAY) – आयसीयु बेडस् 10, वॉर्ड बेडस् 50 असे एकूण 60 बेडस् उपलब्ध आहेत.
तसेच तासगाव, जत, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, आष्टा व कोकरूड या ग्रामीण रूग्णालयांमध्ये प्रत्येकी 25 वॉर्ड बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उप जिल्हा रूग्णालय शिराळा – वॉर्ड बेडस् 45, प्रकाश हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर इस्लामपूर (MJPJAY) – आयसीयु बेडस् 30, वॉर्ड बेडस् 75 असे एकूण 105 बेडस्, ओमश्री हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर विटा (MJPJAY) – आयसीयु बेडस् 13, वॉर्ड बेडस् 32 असे एकूण 45 बेडस् उपलब्ध आहेत.
कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी शासकीय व अधिग्रहित केलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम संकेतस्थळ sangli.nic.in व smkc.gov.in/covid19 यावर उपलब्ध आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close