महाराष्ट्र

कोल्हापूर : सीपीआरमध्ये 20 हजार लिटरचा ऑक्सिजन टँक

450 रुग्णांची दररोज होणार सोय; शनिवारपर्यंत कार्यान्वित

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून 20 हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली. येथील सीपीआरमध्ये हा टँक बसविण्यात आला असून दिवसाला 450 रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार असून शनिवारपर्यंत कार्यान्वित होणार आहे.
30 फूट उंच, 2 मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक आज बसविण्यात आला. यासोबतच 400 क्युबिक मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये 15 ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रा.‍ लि. कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला आहे. सध्या पाईप जोडणीचे काम सुरु असून शनिवारपर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होईल, डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकलयय अभियंता वैजनाथ कापरे यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close