रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे जिल्ह्यात दोन तर पुणे शहरात सहा शाखांचे उदघाटन संपन्न

पुणे :रुग्ण हक्क परिषद, पुणे शहरात
वारजे माळवाडी आणि लोहगाव येथे नव्या तरुणाईने शाखा स्थापन केल्या त्या शाखांचे उदघाटन परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
वारजे माळवाडी येथे पुणे शहर समन्वयक अभिमन्यू तिखे, आसमा शेख, तर लोहगाव येथे पुणे शहर उपाध्यक्ष माऊली जाधव यांच्या पुढाकारातून या दोन शाखा निर्माण झाल्या.
यावेळी जुन्या तीन शाखांचे नुतनीकरण करण्यात आले. शिवाजीनगर विभाग अध्यक्ष प्रशांत ओसवाल, कार्याध्यक्ष उमर शेख यांच्या नेतृत्वाखाली मुळारोड नामफलकाचे उदघाटन झाले. विश्रांतवाडी येथे प्रशांत गायकवाड, कळस येथे स्वाती भोसले. यांनी नामफलकाचे नूतनीकरण केले.
पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून अवघ्या एक महिन्यात मनीषा तिखे यांनी असंख्य युवक – महिला कार्यकर्त्याना परिषदेत सामावून घेतले आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याच्या त्यांच्या स्वभावातून त्या लवकरच पुण्यात संघटनेची उत्तम बांधणी करतील असे उमेश चव्हाण म्हणाले.
यावेळी केंद्रीय कार्यालय प्रमुख दीपक पवार प्रमुख उपस्थित होते. पुणे शहर उपाध्यक्ष अपर्णा साठे, रूग्ण हक्क परिषद केंद्रीय कामकाज समितीचे सदस्य विकास साठे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष पल्लवी मोहोळ उपस्थित होत्या.