रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी पल्लवी मोहोळ,अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निखिल भोसले

पुणे : रुग्ण हक्क परिषदेच्या स्थापनेपासून कार्यरत असणाऱ्या पल्लवी मोहोळ यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी तर राहुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते निखिल भोसले यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी आज निवड करण्यात आली.
रविवारी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी रुग्ण हक्क परिषदेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव दीपक पवार, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन खरात, पुणे शहराध्यक्ष मनीषा तिखे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय गायकवाड, पूणे जिल्हा निरीक्षक अर्चना प्रधान उपस्थित होते.
प्रदेश संघटक सचिन खरात यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी म्हणून पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्याचे निश्चित झाले असतानाच पल्लवी मोहोळ यांनी जिल्ह्यात संघटना वाढीसाठी स्वतः कडे जिल्हाध्यक्ष पदासाठी आग्रही मागणी केल्याने सचिन खरात यांनी पल्लवी मोहोळ यांचीच जिल्हाध्यक्ष पदीनियुक्ती करावी, असे उमेश चव्हाण यांना सांगितले, दीपक पवार यांनी देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर पल्लवी मोहोळ यांनी केलेले काम बघता संधी द्यावी, असे उमेश चव्हाण यांना सांगितले आणि अचानकपणे पल्लवी मोहोळ यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अहमदनगर मधील सोळा तालुक्यातील तरुणांना संघटीत करणारे निखिल भोसले यांनी देखील जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शाखा बांधणी करून संघटना वाढविण्यासाठी, लोकांची कामे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दौंड तालुकाध्यक्ष शशांक गायकवाड यांनी हॉस्पिटल संदर्भी मार्गदर्शन केले तर दौंड शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी यांनी छायाचित्रण केले
पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने पुणे शहर आणि पुणे जिल्हा कमिटीत अध्यक्ष पदासहित अनेक पदनियुक्त्या करण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनी पुणे शहर कमिटीच्या वतीने दहा जुन्या तर पाच नव्या शाखांचे उदघाटन करण्यात येईल, असे पुणे शहर कमिटीचे पदाधिकारी म्हणाले.