सांगली
आम्ही सज्ज आहोत : पालकमंत्री जयंत पाटील
सांगली : सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या १५ यांत्रिक बोटींचे आज लोकार्पण करण्यात आले. बोटींच्या क्षमतेनुसार नदीपात्रात प्रात्यक्षिकही घेण्यात आले. संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे,अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम , आमदार
मानसिंग नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.
Share