पूरग्रस्तांना दिलासा देणारा विश्वजीत पॅटर्न लय भारी..!

पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावासाठी त्यांच्या आयुष्यातील कधीही न विसरणारी घटना म्हणजे कृष्णेचा महापूर. आजही ऑगस्ट महिन्यात पाऊस पडायला लागला की, काळजात धस्स होतं. पण एका गोष्टीच्या जाणिवेने मन शांत होतं. कदम कुटुंबातला हिरा सदैव आपल्यासोबत आहे. विश्वजीत कदम आपल्याबरोबर आहेत.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपलं वाटणारं एकमेव विश्वासाचं नाव.. हा विश्वास आणखी दृढ झाला 2019 च्या महापूरावेळी. विश्वजीतदादांनी केलेले अभूतपूर्व काम बघून.
2019 चा महापूर.. एवढं पाणी कुठलं येतंय.. हा 2005-06 च्या पुरावेळचा अंदाज साफ फोल ठरला. खरा घात इथं झाला.
2005-06 च्या पूरावेळी आपले साहेब मदत-पुनर्वसन मंत्री होते हे आपलं नशीब. *साहेबांनी सानुग्रह अनुदानापासून शेतकर्यांना- व्यापार्यांना मदत ते पुनर्वसन असे सगळे विषय कुशलतेने हाताळले.* त्यामुळे महापुराच्या झळा थोड्या का होईना कमी झाल्या.
यावेळची परिस्थिती वेगळी होती. ‘पारदर्शक’ आणि स्वत:ला अभ्यासू म्हणवणारं सरकार सत्तेवर होतं. मदतीची अपेक्षा दूरच.. पण भेटायला सुध्दा ही मंडळी येणार नाहीत याची शतप्रतिशत खात्री होती. अशा वेळी *‘ना हौसले रुकेंगे, ना रुकेंगे कदम’* म्हणत धावला आमचा मित्र -भाऊ -मुलगा आणि साहेबांच्या माघारी माझी जबाबदारी मानून – – विश्वजीत कदम.
दिनांक 4 ऑगस्ट पासूनच त्यांनी कृष्णाकाठच्या लोकांना प्रत्यक्ष भेटून पाणी वाढणार आहे याची कल्पना लोकांना देऊन त्यांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या.
*येथूनच सुरु झाला या तुफानातल्या योध्दयाचा अथक- निरंतर जनसेवेचा प्रवास.*
ज्या ज्या लोकांना बाहेर काढावं लागत होतं. त्या प्रत्येक गावातल्या लोकांना सूचना देऊन, त्यांच्या राहण्याची, जेवणाची, औषधपाण्याची सगळी व्यवस्था करुन विश्वजीतदादा एक एक गाव करीत होते. जोपर्यंत गावात जाता येत होते तो पर्यंत प्रत्येक गावात जाऊन त्यांनी या अस्मानी संकटाची जाणीव ग्रामस्थांना करुन दिली.
राज्यात सत्ता भाजपची होती पण अजून एकही मंत्री अगर नेता या भागात फिरकला नव्हता.
ज्यावेळी गावांना बेटासारखं स्वरुप प्राप्त झालं, यंत्रणा हतबल झाली, आणि पाणी रेकॉर्ड तोडणार याचा अंदाज आला. त्यावेळी सगळ्यात पहिला सावध झाले – विश्वजीतदादा. मी हे विधान जबाबदारीने करतोय कारण बोटींची संख्या कमी पडणार , लोकांना बाहेर काढावे लागणार. आत अडकलेल्या लोकांसमोर जाऊन त्यांना धीर द्यावा लागणार याची जाणीव त्यांना झाली. 2005-2006 पूरावेळी अशी परिस्थिती आल्यानंतर लष्कराच्या बोटी साहेब – विश्वजीतदादांनी मागविल्या होत्या.
तीच वेळ पुन्हा आली. विश्वजीतदादांनी एन्.डी.आर.एफ्. च्या बोटी मागवून घेतल्या. आत अडकलेल्या लोकांची संख्या जास्त होती. पाण्याचा प्रचंड प्रवाह असताना विश्वजीतदादा बोटीतून गावात गेले. सुरक्षितपणे आपण सर्वजण बाहेर पडू या. महिला, मुले पहिल्यांदा जाऊ देत. मी तुमच्यासोबत आहे. शेवटचा माणूस मी असेन असा विश्वास आणि धीर दिला.
*मदतीचा विश्वजीत पॅटर्न*
पूरग्रस्त भागातील लोकांसाठी काहीतरी करायला हवं किंवा अशा आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत मिळाली पाहिजे यासाठी विश्वजीतदादांनी *“डॉ.पतंगराव कदम आपत्ती निवारण कक्ष”* स्थापन करुन त्या माध्यमातून पूरग्रस्त गांवामध्ये प्रत्येक घरोघरी लोकांच्या पुनर्वसनासाठी सर्व संसारोपयोगी साहित्यासह जीवनावश्वक वस्तूंनी युक्त अशा 25,000 कीटचे वाटप केले व लोकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत केली. धर्म, जात यांचा विचार न करता सर्वांना ही अनमोल भेट दिली. पूरपरिस्थितीमध्ये सहाय्यभूत असणार्या नावाडी लोकांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देऊन त्यांचा गौरव केला. तसेच ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपये देऊन त्यांचे सांत्वन केले. आपल्या मर्जीतल्या अनेक लोकांना साहित्य वाटणारे बरेच बघितले पण पलूस-कडेगांव कुटुंब मानून सदैव जनतेसोबत असणारं एकमेव व्यक्तिमत्व बघितले ते म्हणजे विश्वजीतदादा..
पूरादरम्यानच्या काळातच त्यांनी पूरपरिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने एक कृती आराखडा तयार केला.. मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांना पूरपरिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले व त्या संदर्भाने योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात याबाबत माहिती दिली. यावेळी भाजपचे मंत्री बोटीतून सेल्फी घेण्यात व्यस्त होते.
भारती परिवारातल्या प्रत्येक सदस्यानं महापूर काळात मोठं योगदान दिलं. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मदतीच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. भारती विद्यापीठाच्या प्रत्येक शाळेत पूरग्रस्तांची राहण्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टरचं पथक पुरग्रस्तांच्या सेवेसाठी होतं. सोनहिरा कारखान्याच्या वतीने पशूधनासाठी मुबलक चार्याची व्यवस्था केली गेली.
भारती परिवाराचा सदस्य पूरानंतर गाव अन् गाव स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सामील झाला. रोगराई पसरु नये म्हणून प्रत्येक गांवामध्ये प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली. प्रत्येक गावात आरोग्य शिबीर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासणी करण्यात आली.
मदतीचा विश्वजीत पॅटर्न काय असतो याची प्रचिती कृष्णाकाठाला या निमित्तानं आली.a
एवढंच दिलसे म्हणावंसं वाटते …
जनहित मे जारी…
विश्वजीतदादा …
*लय भारी*
-दीपक पाटील,भिलवडी