विचारपुष्प

रुळ टाकण्याखेरीज, रस्तेही बांधणारी भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरची मने आणि दुर्गम भाग जोडते

रुळ टाकण्याखेरीज, रस्तेही बांधणारी भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरची मने आणि दुर्गम भाग जोडते

In the USBRL project, Railways has constructed almost 205 km of roads in Katra- Banihal stretch to leading to the various sections of the massive Rail project that will change the development trajectory of the state

युएसबीआरएल
प्रकल्पांतर्गत रेल्वेने कात्रा बनिहाल मार्गावर जवळपास दोनशे पाच किलोमीटरचे रस्ते बांधले. यातले बरेचसे रस्ते हे राज्याच्या विकासाची दिशा बदलणाऱ्या भव्य रेल्वे प्रकल्पाच्या विविध विभागांना जोडणारे आहेत

The total cost of construction of these access roads has been about Rs. 900 Cr

या रेल्वे प्रकल्पाकडे जाणारे रस्ते बांधण्यास जवळपास 900 कोटीं रुपयांपर्यंत खर्च झाला.

The roads have provided connectivity to about 70 villages of Reasi and Ramban districts of J&K which were hitherto not connected by a pucca road

या रस्त्यामुळे रियासी आणि रामबान या जम्मू-काश्मीरमधील जिल्ह्यामधील जवळपास 70 गावांना जोडणारे रस्ते उपलब्ध झाले. आत्तापर्यंत या गावांपर्यत पोचणारे पक्के रस्तेही नव्हते.

These roads in tough terrain areas will be used by citizens of J&K and boost an all round regional development

खडतर भूभाग असलेल्या या प्रदेशातील जम्मू-काश्मीरचा नागरिकांना आता रस्त्याचा वापर करत स्वतःचा आणि या प्रदेशाचा सर्वंकष विकास साधता येईल.

आशिष चांदोरकर
सार्वजनिक धोरण विश्लेषक, पुणे

भारतीय रेल्वे जाळ्याच्या माध्यमातून “उधमपुर-कटरा-काझीगुंड-बारामुल्ला” राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प हा 272 किलोमीटरचा रेल्वे मार्ग काश्‍मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडतो. हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल तेव्हा जम्मु काश्मीरमधील दूरवरच्या आणि दुर्गम प्रदेशाला सर्व मोसमात उपलब्ध असणारे, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारे प्रवासाचे साधन उपलब्ध होईल. दोन आंतर्राष्ट्रीय सीमारेषा या प्रदेशात असल्यामुळे या प्रदेशाला धोरणात्मक महत्त्व आहे. म्हणूनच हा रेल्वेमार्ग देशाच्या लष्करालासुद्धा सहाय्यकारी ठरेल.

प्रकल्पाची उत्तम अंमलबजावणी तसेच त्यावरची देखरेखही उत्तम प्रकारे व्हावी यासाठी प्रकल्पाचे बांधकाम चार टप्प्यात विभागून करण्यात आले. उधमपुर-कटरा (25 किमी), काझीगुंड-बारामुल्ला (118 किमी) आणि बनिहाल-काझीगुंड (18 किमी) हे तीन टप्पे पूर्ण होऊन कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित कटरा-बनिहाल या 111 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या 111 किमी मार्गावरील 97 किमी भागात म्हणजेच 87% भाग बोगदयांचाच आहे.

(तीव्र उतार असणारा भूभाग)

या विभागाने रेल्वेच्या इतिहासातील अनेक ‘प्रथम’ प्रत्यक्षात आणले. T-49 (12.75 किमी) हा
देशातील सर्वात जास्त लांबीचा वाहतुकीसाठीचा बोगदा, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पूल (359 मीटर) आणि अंजी पुल हा केबलवर उभारलेला पूल. या मार्गावरील स्थानकांपैकी अनेक स्थानके एकतर बोगद्यामध्ये किंवा पुलावर वसली आहेत.

युएसबीआरएल प्रकल्पातील मार्ग हिमालयातले आहेत. हिमालय हा भूगर्भीय दृष्ट्या तरुण आणि अजूनही क्रियाशील असलेला पर्वत आहे. सध्या ज्याचे बांधकाम सुरू आहे तो कटरा-बनिहाल हा जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विभाग अतिशय उंच-सखल भूभाग आणि खोल दऱ्यांखोऱ्यांनी भरलेला आहे.

गाडीरस्ता नसल्यामुळे आत्तापर्यंत या भागात सहजपणे पोहोचता येत नव्हते. त्यामुळे रेल्वेला सर्वात आधी तिथे पोहोच रस्ते बांधावे लागले. बांधकामाच्या जागी अवजड मशिनरी, माल, माणसे यांची वाहतुक करण्यासाठी आधी अशा रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे होते. भविष्यात देखभालीच्या कामासाठीही हेच रस्ते उपयोगी पडतील.

खरेतर, या आव्हानात्मक भौगोलिक पट्ट्यातील दुर्गम भागांना जोडणारे पोहोच रस्ते बांधणे हाच एक धाडसी प्रकल्प होता. मुळातच हा प्रदेश डोंगर दऱ्यांचा. अनेक उंच-सखल भाग, वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना, भूगर्भशास्त्रीय परिस्थिती, अनेक नैसर्गिक जलस्रोत, डोंगरकडे यामुळे या रस्त्यांच्या बांधकामांचे नियोजन आणि बांधकाम हाच एक खर्चिक मामला होता. बऱ्याच ठिकाणी तर पार करायलाही जमणार नाहीत असे डोंगराळ भाग किंवा नदीचे खोरे अशा जागा होत्या. अशा विभागात रस्त्यांसाठी बोगदे खोदले गेले तसेच अनेक छोटे-मोठे पूल बांधण्यात आले.

चिनाब ही प्रचंड नदी. तिच्यावर धामकुंड आणि रामबान जिल्ह्यांदरम्यान मोठा 135 मीटर पूल बांधून तिला आवाक्यात आणले गेले. यासाठी 7.2 कोटी एवढा खर्च आला.
‘बातल गाला रस्ते बोगदा’ हा महत्त्वाच्या रस्त्यावरील साधारण 7.0 कोटी रुपये खर्चून बनवलेला 492 मीटर लांबीचा वैशिष्ठ्यपूर्ण चिनाब पूलावरील दोन वर्क-साईट्सना जोडणारा बोगदा. मेगा ब्रिज नं. 43 ( 777 मी), बाक्कल गावाजवळील T5 या लांबलचक बोगद्याचे P2 पोर्टल इत्यादी

याशिवाय, 26 बेली पूल, दलदल ओलांडण्यासाठी केलेले 128 रस्ते किंवा पाईप आणि 216 पाण्याखालून जाणारे पाईप्स यांचेही बांधकाम करण्यात आले. संपूर्ण रस्त्यांचे हे जाळे वरून काळे कुळकुळीत रस्ते आणि खाली केलेले संरक्षक काम अशा तऱ्हेचे आहेत. हे संरक्षक काम म्हणजे आधीचे आधारभूत भाग, रस्ता खचू नये म्हणून गॅबियन भिंत, साचलेले पाणी वाहून नेणाऱ्या जागा( कॅच वॉटर ड्रेन), अपघात रोधक अडथळे (क्रॅश बॅरिअर) इत्यादी. थोडक्यात, हे रस्ते बनवताना ते कोणत्याही ऋतूमानाला तोंड देतील याकडे पूर्णपणे लक्ष पुरवण्यात आले आहे.

याप्रमाणे
युएसबीआरएल प्रकल्पात जवळपास 205 किलोमीटर पोहोच रस्ते बांधून पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पामध्ये काम करणारे लोक, मग ते इंजिनियर असोत, मशीन ऑपरेटर किंवा कामगार यांचा उत्साह व दृढनिश्चय यामुळेच हे शक्य झाले. आव्हानात्मक परिस्थितीत म्हणजे टेकडीच्या सरळसोट उतारावर अगदी कडेने दगड फोडून वर्तुळाकार रस्ता बांधण्यासारखे आव्हानात्मक कामही त्यांनी सहजपणे पार पाडले. तेही एखादी दुर्घटना किंवा साधा अपघातही होऊ न देता. या पोहोच रस्त्यांच्या बांधकामासाठी आलेला एकूण खर्च जवळपास 900 कोटी रुपये.

या रस्त्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील रियासी आणि रामबान या दोन जिल्ह्यांमधील 70 गावांपर्यंत सहज पोहोचता यायला लागले. आता आतापर्यंत या गावांपर्यंत जाणारे पक्के रस्तेच नव्हते. या गावांपैकी काही मुख्य गावे याप्रमाणे; गुणी, पैखड, ग्रॅन, बातलगाला, बाक्कल, कौरी, दुग्गा, सुरुकोट, सवालकोट, बसिंधाधार, इंद, बरल्ला, संगलदल, दालवा, धरम, खोली, मेग्दर, संबर, उर्नीहाल, सिरन, कुंदन, खारी, हिंगऩी, अर्पिंचला, तत्निहाल, चॅप्लेन आणि बाणकूट. या गावांमधील 1.5 लाखापेक्षा अधिक स्थानिकांना रेल्वेमुळे झालेल्या सुविधांचा फायदा मिळतो. या गावातले गावकरी आता हे रस्ते वाहतुकीसाठी वापरतात.

पूर्वी, या गावांकडे जाणारे रस्ते म्हणजे छोटी पायवाट किंवा काही ठिकाणी तर चक्क तरी किंवा नावा. लोकांना मोठी मोठी अंतरे पायी चालतच पार करायची सवय. अगदी मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांतही निसरडे उतार किंवा खडकाळ वाटा या पार कराव्याच लागत असत.
दुर्गमतेमुळे ही गावे मूलभूत विकासापासूनही वंचित राहिली. हे गावकरीही सगळ्यांपासून, आत्ताच्या जगापासून तुटलेलं असं एकांत, आदिम आणि खेडवळ जीवन जगत होते. डोंगराळ भागात वस्ती असल्यामुळे थंडीच्या मोसमासाठी त्यांना साठा करून ठेवावा लागत होता. तसेच त्यांच्या थोड्याशा जमिनीत जे काही किडूकमिडूक उगवेल त्यावर गुजराण करावी लागत होती. शिक्षण, बाजारपेठा आणि आरोग्य व्यवस्था या तर त्यांच्यासाठी बऱ्याच दूरच्या गोष्टी आहेत.

पण रेल्वेने बांधलेल्या रस्त्यांमुळे मात्र हे चित्र पूर्णपणे बदलल्याचे दिसते. लोकांना ये जा करणे वा सामान आणणे नेणे आता सहज सोपे झाल्यामुळे हे रस्ते म्हणजे स्थानिक नागरिकांसाठी वरदानच ठरले आहेत. औषधोपचार, बाजारपेठ, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांच्यात भर पडत आहे. त्यामुळेच संगलधन, अर्पिंचला, सुंबर, बसिंधधार यासारखी आत्तापर्यंत नजरेआड असलेली गावे वेगाने विकसित होत आहेत.

गावे ‌असोत किंवा थोडी जास्त लोकवस्ती असणारी शहरे, इथे आधुनिक सोयीसुविधांचा अभाव दिसतो. आता त्यांच्यामध्ये होत असलेल्या कायापालटाचे श्रेय नक्कीच युएसबीआरएल प्रकल्पाला जाते.
रेल्वे, जम्मू काश्मीर व्यवस्थापन यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत
दूरवरच्या दुर्गम वस्त्यांपर्यंत मुख्य रस्ते बांधण्यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकासाचे वारे पोहचू शकत आहे.

या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या पोहोच रस्त्यांबद्दल सविस्तर माहिती:

अवजड सामान वाहून नेण्यासाठी चिनाब नदीवर धामकुंड जवळ रामबाण गुल राज्य महामार्गावर पूल बांधण्यात आला. (विस्तार 1X100 + 1X35 ). हा रस्त्यावरील पुलामुळे आजूबाजूची गावे जोडली गेली. उदा. संगलदान, गुल, माहोर, अर्नस, कंथान, रियासी ही जम्मू-कश्मीर मधील गावे.

T5 बोगदा आणि चिनाब पूल (बाक्कल जवळील)

रस्त्यावरच्या बोगद्याचे बांधकाम (बातल गाला) हा बोगदा 492 मीटरचा असून तो T-5 बोगदा आणि चिनाब पूल (बाक्कल जवळ) यांनी जोडतो.

कटरा-बनिहाल मार्गावरील वर्क-साईट्सना जोडणारा 205 किमीचा प्रकल्पातील पोहोच रस्ता (111किमी).

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close