महाराष्ट्रसांगली

सर्व #कोरोनाग्रस्तांना #महात्मा_फुले #योजनेचा #लाभ द्या अन्यथा रस्त्यावर उतरु : #विशाल_पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या फक्त दहा ते पंधरा टक्के रूग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार केले जात आहेत. इतर रूग्णांकडून मात्र भरमसाठ बिलांची आकारणी केली जात आहे. किमान ५० हजार रुपये ते दीड लाख रुपयांचे बील खासगी रुग्णालयांकडून आकारले जात आहेत. #सर्वच_कोरोनाग्रस्तांना_कोणतेही_निकष_न_लावता_थेट_महात्मा_फुले_योजनांचा_लाभ_द्यावा #अन्यथा_रस्त्यावर_उतरण्याशिवाय_पर्याय_राहणार_नाही, असा इशारा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष #विशाल_पाटील यांनी दिला आहे.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल चार हजार रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शासकीय रूग्णालय फुल्ल झाले आहे. खासगी रूग्णालयातील काही बेड जिल्हा व महापालिका प्रशासनाने राखीव ठेवले आहेत. मात्र या ठिकाणी रूग्णांची लुबाडणूक सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. कोरोना रूग्णांवर शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र जिल्ह्यात परिस्थिती वेगळी दिसत आहे. केवळ दहा ते पंधरा टक्के रूग्णांची बिले या योजनेतून माफ करण्यात येत आहेत.

इतर रूग्णांना ७५ हजार ते दीड लाखापर्यंत बिले भरावे लागत आहेत. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांचे कंबरडे मोडत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या सर्व रूग्णांचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करावेत, अशी मागणी विशाल पाटील यांनी केली. तसेच मिरजेच्या शासकीय रूग्णालयात वाढीव बेडची सोय करावी. भविष्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव बेडची सोय होणे आवश्यक आहे. तसेच होम आयसोलेशनची संख्या वाढवावी, अशी मागणी देखील विशाल पाटील यांनी केली आहे.

मिरज शासकीय रुग्णालयात व सांगली सिव्हीलमध्ये बेडची संख्या वाढवा… मिरज शासकीय रुग्णालयाची क्षमता जवळ जवळ ५०० बेडची आहे. असे असताना या ठिकाणी अजून पूर्ण क्षमता वापरली जात नाही. येथे अजून बेडची व्यवस्था करावी तसेच सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र विभाग कोरोनासाठी दिल्यास त्याठिकाणी देखील ७५ ते १०० बेडची व्यवस्था होईल. सांगलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये अजूनही क्षमतेपेक्षा कमी रुग्ण दिसत आहे. पण प्रत्यक्षात कोरोनाग्रस्तांना बेड उपलब्ध होत नाहीत. याचबरोबर प्रसंगी सांगलीचे जादा रुग्ण इस्लामपूर येथील हॉस्पिटलमध्ये पाठवावेत, अशी मागणी देखील विशाल पाटील यांनी केली आहे.
रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी लक्षणे नसणार्‍या किंवा सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांना घरातच उपचार केले जावेत मात्र त्यासाठी सध्या आशा वर्कर मार्फत जी सेवा दिली जाते त्याऐवजी आयुष डॉक्टर अथवा तज्ञांची दर दोन दिवसांतून एक व्हिजिट केली तर होम आयसोलेशनमधील रुग्णांना दिलासा मिळेल व जास्तीत जास्त रुग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देतील. ही व्यवस्था बळकट झाल्यासच रुग्णालये गंभीर रुग्णांसाठी उपलब्ध होतील. याचाही विचार व्हायला हवा अशीही मागणी त्यांनी केली आहेे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close