
*
उपाध्यक्षपदी दिलीप कोरे-रणजीत पाटील
*सर्व जातीधर्मातील व्यावसायिकांना एकञित करून जपला आदर्श
*गावच्या विकासासाठी असणार नव्या संकल्पना
भिलवडी: सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश मारुती पाटील यांची निवड करण्यात आली. दिलीप विश्वनाथ कोरे आणि रणजीत अशोक पाटील यांची उपाध्यक्षपदी, कार्याध्यक्षपदी जावेद तुफान तांबोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भिलवडी व्यापारी संघटनेच्या सचिवपदी महेश सदाशिव शेटे,सहसचिवपदी विजय अण्णा शिंदे, खजिनदारपदी दिलावर बालेचाँद यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.
पत्रकार प्रतिनिधीपदी घनश्याम मोरे, सोशल मीडिया प्रमुखपदी समीर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
यापूर्वी भिलवडी आणि माळवाडी येथील व्यापाऱ्यांची एकत्र एकच संघटना होती.माळवाडीने स्वतंत्र व्यापारी संघटना स्थापन केल्यानंतर भिलवडीच्या सर्व व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड केली. प्रत्येक व्यवसायाच्या एका प्रतिनिधीला कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
यावेळी रमेश पाटील,की महापूर किंवा कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहू. सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देऊ. शासकीय योजनांचा लाभ व्यापाऱ्यांना मिळवून देऊ.
दीपक पाटील यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले.यावेळी भिलवडीतील सुमारे तीनशे व्यापारी उपस्थित होते. घनश्याम मोरे यांनी आभार मानले.